शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

"सासू मला छळते, पैसे मागते, मारहाण करते"; वैतागलेल्या जावयाने केला गंभीर आरोप अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:08 IST

"माझे सासू-सासरे माझ्याकडे पैशाची मागणी करायचे. मी माझ्या मुलांचं पोट भरण्यासाठी काम करायचो."

कोटा येथे सासूच्या टोमण्यांना कंटाळून जावयाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येनंतर तीन दिवसांनी तरुणाच्या पाकिटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटवरून या प्रकरणातील धक्कादायक खुलासा झाला आहे. चेतन जांगीड असं या तरुणाचं नाव असून हा केशवपुरा सेक्टरचा रहिवासी होता. चेतनने चार दिवसांपूर्वी स्वत:च्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलं. सासरच्या मंडळींनी मारहाण करून लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करत मृताच्या नातेवाइकांनी न्यायाची मागणी केली आहे.

चेतनने आपल्या सुसाईड नोटमध्ये सासूला तुरुंगात पाठवण्याबाबत आणि त्याच्या संपत्तीतील हिस्सा पत्नीला न देण्याबाबत लिहिले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. चेतनने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, "मी चेतन आणि पूजा आम्ही दोघं एकत्र राहायचो. माझे सासू-सासरे माझ्याकडे पैशाची मागणी करायचे. मी माझ्या मुलांचं पोट भरण्यासाठी काम करायचो."

"पूजाच्या आईला तुरुंगात टाका"

"सासू-सासऱ्यांनी पूजाचे दागिने विकले. दोन लाख द्या आणि मुलांना घेऊन जा, असे सांगितले. मी त्यांना दोनदा घ्यायला गेलो असता त्यांनी मला बेदम मारहाण करून पोलीस ठाणे गाठले. ते मला सांगतात की तुझ्या आई-वडिलांच्या घरातून हिस्सा घेऊन ये. माझ्या सासूबाईंचे टोमणे ऐकून मी अस्वस्थ होतो. माझ्या मृत्यूनंतर पूजा आणि मुलांना कोणताही हिस्सा देऊ नये. पूजाच्या आईला तुरुंगात टाका."

"मी पूजाला फसवले नाही"

"माझ्या मृत्यूनंतर पूजा आणि दोन्ही मुलांना कोणत्याही गोष्टीत हिस्सा देऊ नये. मला माझ्या आई-वडिलांकडून कोणताही हिस्सा द्यायचा नाही. पूजा आणि माझे काही भांडण झाले नाही. तिच्या आईने माझ्याकडे पैसे मागितले. जयपूरला आलास तर मारून टाकेन असं सांगितलं. माझे सासू, सासरे आणि पूजा यांच्यावर कारवाई करा. मी मुलांची शपथ घेतो. मी पूजाला फसवले नाही" असं ही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.