शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सरण रचून युवकाची आत्महत्या; लग्न जुळत नसल्याने स्वत:ला जाळून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 09:36 IST

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा तरुण गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता.

खामगाव (जि. बुलडाणा) : लग्न जुळत नसल्याच्या निराशेतून एका  वैफल्यग्रस्त तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून शेतात आत्मघात केला. गुरुवारी सकाळी ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे उघडकीस आली. या तरुणाने आत्मघात करण्यापूर्वी स्वत:चे सरण रचल्याचीही चर्चा परिसरात आहे.  

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा तरुण गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. शेतात कामाला जातो म्हणून महेंद्र बुधवारी घराबाहेर पडला. सायंकाळी  त्याने स्वत:च्या शेतात अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर जवळच असलेल्या तुरीच्या गंजीनजीक त्याने स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, आगीत होरपळण्याच्या वेदना असह्य झाल्याने प्रचंड आरडाओरड करत त्याने जवळच असलेल्या पाण्याच्या स्रोताजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच शेणखताच्या ढिगाऱ्यावर कोसळून तो जागीच गतप्राण झाला. 

गुरुवारी सकाळी काहीजणांनी त्याचा मृतदेह बघितला. महेंद्र याच्या पश्चात नामदेव कोंडीराम बेलसरे (८०) व धृपदाबाई नामदेव बेलसरे (७२) हे आई-वडील आणि एक विवाहित बहीण असून, त्याने आत्मघात का केला? याचा पोलीस शोध घेत आहेत. नैराश्येतून तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस सूत्रांकडून केला जात आहे. शेगाव येथे बहिणीकडे गेल्यानंतर त्याने लग्न जुळत नसल्याची खंत बहीण जावई धनंजय शेडे (४३) यांच्याकडे व्यक्त केली होती. शेगाव येथून परतल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

जीव वाचविण्यासाठी आकांताने धडपड! आगीचे चटके असह्य झाल्याने तो जिवाच्या आकांताने शेतात इतरत्र धावू लागला. पाण्याच्या स्रोताजवळ पोहोचण्यापूर्वीच तो गतप्राण झाला. वेदना असह्य झाल्याने पऱ्हाटी, तुराटीच्या गंजीवरून उडी घेत तो पाण्याच्या स्रोताजवळ आल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.२०२०च्या घटनेची आठवण खामगाव तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपूर लांडे येथे ११ जून २०२० रोजी एका वृद्ध दाम्पत्याने स्वत:चे सरण रचून आत्मघात केल्याची चर्चा होती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा