शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

वाढदिवसाची पार्टी, मित्रांसोबत जल्लोष; एक चूक भोवली अन् Birthday लाच मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 17:53 IST

उत्तर प्रदेशातील शिवशंकरी धाममधील दीक्षितपूर गावात ही वेदनादायक घटना घडली आहे.

मिर्झापूर - वाढदिवसाची पार्टी. मित्रांसोबत सेलिब्रेशन. मग घरी परतण्याची तयारी. आनंद आणि उत्साहाने भरलेला दिवस पण त्यात एक चूक भोवली आणि आयुष्य संपले. ज्याच्या घरात मुलाच्या बर्थडे पार्टीची वाट पाहत होते, तिथे त्याचा मृतदेह पोहोचला. आनंदाच्या वातावरण शोक पसरला. एका चुकीनं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. 

उत्तर प्रदेशातील शिवशंकरी धाममधील दीक्षितपूर गावात ही वेदनादायक घटना घडली आहे. वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना दीक्षितपूर ओव्हरब्रिज ओलांडताना एका टोकावरून दुसऱ्या टोकावर  उडी मारताना हा अपघात झाला. ओव्हरब्रिजवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी स्टंटबाजीचा प्रकार कायम होत असे. या तरुणानेही स्टंट करण्याच्या नादात हा अपघात झाला.

मिर्झापूर जिल्ह्यातील अदलहाट पोलीस स्टेशन हद्दीतील पचेगडा राजपूर, दीक्षितपूर येथील रहिवासी जयरामचा मुलगा धर्मेंद्र कुमार, वय २०, शनिवारी वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परतत होता. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर धर्मेंद्र घरी परतण्यासाठी निघाला होता. त्याच्या मित्रांनी त्याला कॉलेजजवळ सोडलं. मित्र निघून गेल्यानंतर धर्मेंद्रने कॉलेजमधून सायकल घेण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजवरील पलीकडे उडी मारली. दुभाजकाच्या मध्यभागी उडी मारताना विद्यार्थी धर्मेंद्रचा तोल गेला. त्या पुलावर न जाता तो खाली पडला. पुलाची उंची सुमारे ६० फूट असल्याने तो खाली पडून जागीच ठार झाला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केलाओव्हरब्रिजवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. धर्मेंद्र हा दोन भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होता. मोठा भाऊ जितेंद्र कुमार हा बाईक मेकॅनिक आहे. एक बहीण आहे. तिचे अजून लग्न झालेले नाही. वडील राजगीर मिस्त्री आहेत. पूल ओलांडताना खाली पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे असं  पोलीस अधिकारी त्रिवेणी लाल सेन यांनी सांगितलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"