शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथांची 'सापशिडी'! भ्रष्टाचारी डीएसपी थेट शिपाई झाला; खालच्या पदावर डिमोशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 12:01 IST

योगी आदित्यनाथांनी भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबविली आहे. गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याबरोबरच त्यांना शिक्षाही देण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाईचा प्रघात पाडला आहे. गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याबरोबरच त्यांना शिक्षाही देण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. एवढेच नाही तर न्यायालयीन लढाईतही ही बुलडोझर कारवाई योग्य कशी ते पटवून देत, गुन्हेगारांना दिलासा मिळण्याचे सर्व मार्गच बंद केले आहेत. आता तर त्यांनी बड्या पोलीस अधिकाऱ्याला थेट शिपाई पदावर नेऊन ठेवले आहे. 

योगी आदित्यनाथांनीभ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबविली आहे. काही दिवसांपूर्वी रामपूर नगरचे डीएसपी किशोर शर्मा यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या डीएसपींवर थेट डिमोशन करण्याची कारवाई करण्याचे आदेश योगी आदित्यनाथांनी दिले आहेत. यामुळे डीएसपी पदापर्यंत पोहोचलेल्या अधिकारी त्यांच्या मुळ पदी म्हणजेच शिपाई पदावर पदावनती करण्यात आली आहे. 

विद्या किशोर शर्मा यांना २०२१ मध्ये रामपूरमध्ये पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करत बदली करण्यात आली होती, तसेच चौकशीही सुरु करण्यात आली होती. या चौकशीत शर्मा दोषी आढळल्या आहेत. यामुळे योगी आदित्यनाथांनी त्यांना शिपाई बनविले आहे. याची महिती गृह विभागाकडून ट्विट करण्यात आली आहे. रामपूरमधील तत्कालीन डीएसपी विद्या किशोर शर्मा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी आढळल्याने त्यांच्या मूळ पदावर परत पाठविण्यात आले आहे.

काय होते प्रकरण...स्वामी विवेकानंद कंपनीचे संचालक विनोद यादव आणि इंस्‍पेक्टर रामवीर यादव यांनी एका महिलेवर सामुहिक बलात्कार केला होता. य़ा प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप या महिलेने केला होता. तसेच यासाठी ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचेही म्हटले होते. याचा व्हिडीओ देखील तिने पुरावा म्हणून दिला होता.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथCorruptionभ्रष्टाचार