शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिष्णोई गँगच्या किलरमुळे यवतमाळवर लक्ष; आयबी, एटीएसचा आता फोकस; फाेलपणा उघड

By सुरेंद्र राऊत | Updated: June 2, 2025 12:03 IST

विदेशातून येत हाेता पैसा

सुरेंद्र राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टाेळीचा सदस्य यवतमाळ शहरात दडून असू शकताे, यावर काेणाचाच विश्वास नव्हता. उच्चस्तरीय तपास यंत्रणांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केले. यवतमाळ एलसीबीने थेट बिष्णाेई व गुज्जर गँगसाठी काम करणारा काॅन्ट्रॅक्ट किलर जेरबंद केल्यानंतर आयबी व एटीएसने आता यवतमाळवर लक्ष केंद्रित केले आहे. हे उच्चस्तरीय तपास यंत्रणाचे माेठे अपशय मानले जात आहे. देशपातळवीर दशहत निर्माण करणाऱ्या लाॅरेन्स बिष्णाेई व बिल्लू गुज्जर गँगसाठी भूपेंद्रसिंग ऊर्फ भिंडा जरनैल सिंग (३५, रा. हाेशियारपूर पंजाब) हा काम करीत हाेता.

गँगसोबत कसा जुळला?

गँगसाेबत जुळण्यापूर्वी भिंडावर शरीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. यातीलच गुन्ह्यात ताे कपूरतला माॅर्डन सेंट्रल जेल येथे असताना, लाॅरेन्स बिष्णाेई याच्या संपर्कात आला. नंतर ताे पुढे बिल्लू गुज्जर याच्या गँगसाेबत काम करू लागला. शेवटचा खून बाडमेर राजस्थान येथे केल्यानंतर भिंडा भूमिगत झाला. त्यानंतर उच्चस्तरीय तपास यंत्रणांकडून त्याचा शाेध घेण्याचे काम थांबविण्यात आले होते.

विदेशातून येत हाेता पैसा

भिंडाने २०२२ मध्ये राजस्थानमध्ये लग्न करून पत्नीच्या नावे बँक खाते उघडले. या खात्यात कॅलिफाेर्नियातून पैसे येत हाेते. नंतर पत्नी यवतमाळात वास्तव्य करत हाेती. तिच्या खात्यात दरमहा विदेशातून पैसा येताे, हे यंत्रणेला हेरता आले नाही. भिंडाला कॅलिफाेर्नियातूनच व्हर्च्युअल सीम मिळाले. त्याद्वारे ताे साेशल मीडिया वापरायचा व गाेल्डी ब्रार, साैरभ गुज्जर यांच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. अनेकदा त्याने व्हिडीओ काॅलचा वापर केल्याचेही पुढे आले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी