शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाड, पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी करणारी टोळी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:40 IST

आरोपींकडून ६५ हजार १०० रु पयाचे जिवंत काडतूस, पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

बिरवाडी : महाड, पोलादपूर तालुक्यांत हत्याराची तस्करी सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत महाड तालुक्यातील ढालकाठी येथील रहिवासी तुलसीराम चंद्रकांत वाडकर (३३) व पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील राजेंद्र राजू साटम यांना हत्यारासह अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ६५ हजार १०० रु पयाचे जिवंत काडतूस, पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस गस्तीवर असताना १२ नोव्हेंबर रोजी दिवा पूर्व येथे एका संशयित व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी कट्टा आढळला. त्याने दिलेल्या माहितीवरून ठाणे पोलिसांच्या पथकाने, सापळा रचून तुलसीराम चंद्रकांत वाडकर याला १२ नोव्हेंबर रोजी देशी बनावटीचे पिस्तूलसह अटक करण्यात आली. त्यानंतर १५ नोव्हेंबरला पोलादपूर तालुक्यातील राजेंद्र राजू साटम याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२ बोअर बंदूक (रायफल ) व एक १२ बोअर काडतूस हस्तगत करण्यात आले.अधिक चौकशीत आणखी एक १२ बोअर बंदूक (रायफल), २ जिवंत राऊन्ड (काडतूस), असा एकूण ६५ हजार १०० रु पये किमतीचा माल हस्तगत केला. रविवारी महाड पोलिसांनी याबाबत पत्रक प्रसिध्द करून माहिती दिली.रायगड पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञहत्याराची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुक्काम रायगड जिल्ह्यात असल्याची बाब समोर आल्याने या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गुप्त विभागाच्या कर्मचाºयांकडून गुन्हेगाराची माहिती मिळविण्यात अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत रायगड पोलीस अंधारात असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यापूर्वी देखील जनावर तस्करीमध्ये ठाणे पोलिसांनी महाड व पोलादपूरमधून आरोपीना अटक केल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी