शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लोको ट्रेनच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:46 IST

सॅनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत मालवाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगाराचा मृत्यू झाला.

वरठी(भंडारा) : सॅनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत मालवाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगाराचा मृत्यू झाला. सदर घटना काल रात्री १०.३५ च्या सुमारास घडली. यात विकास गणवीर (५३)च्या सुमारास कंपनीत घडली. मृतकाचे नाव विकास गणवीर(५३) रा शास्त्री वार्ड वरठी असे आहे. 

मृतक विकास गणवीर हे सॅनफ्लॅग कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामावर होते. घटनेच्या दिवशी रात्रपळीवर कार्यरत होते. लोकोपायलट ट्रेन द्वारा होणारी मालवाहतूक डब्यातून येणाऱ्या मालाला वॅगन ट्रीपलर च्या साहायाने खाली करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या गाडीला इतर डब्यापासून जोडण्याचे काम सुरू असताना लोकोपायलट च्या चुकीने मृतक विकास दोन्ही डब्यांच्या मधात अडकला व त्याला जोरदार धडक बसली. यात त्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. मुलगी अभियांत्रिकीला शिकत आहे. दोन्ही मुले लहान असून कुटुंबाचा आधार हारावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार आवश्यक असलेली मदत व एकाला स्थायी नोकरी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 

हा कंपनीचा अमानुष व्यवहारविकास हा अपघात रात्री १०.३५ च्या सुमारास झाले. तो वरठी येथे राहत असून त्याचे निवासस्थान कंपणीपासून जवळच आहे. पण अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात हयगय करण्यात आल्याचा आरोप बहीण सुरेखा हुमने यांनी केला आहे. अपघाताची माहिती न देता परस्पर मृतदेह भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात होण्यास कंपनी व्यवस्थापन कारणीभूत असून अपघाताचे मूळ कारण दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व स्थायी नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या आंदोलन सुरु आहे.