शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये महिलेची गळा चिरून हत्या; तपासासाठी तीन पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 07:32 IST

ओळख पटविण्याचे काम सुरु

उरण - उरण तालुक्यातील पिरकोन- सारडे गाव परिसरातील रस्त्यालगत सोमवारी एका अनोखळी महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उरण पोलिस वरिष्ठांसह घटनास्थळी दाखल झाले असून, या महिलेच्या हत्येप्रकरणी तपासकामी तातडीने तीन पथके तयार केली असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.

पिरकोन - सारडे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत सोमवारी सकाळी सुमारे ३०-३५ वयाच्या एका विवाहित महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. पिरकोन गावातील नागरिकांनी याप्रकरणी गांभीर्य ओळखून सदर खळबळजनक घटनेची माहिती तत्काळ उरण पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपायुक्त पंकज डहाणे, न्हावाशेवा बंदर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना विवाहित महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तसेच गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत मिळावी यासाठी डॉगस्कॉड, फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण केले होते. 

स्थानिक नसल्याचा संशय विवाहिता परिसरातील नसावी, तर उरणबाहेरून हत्या करून मृतदेह रात्रीच्या वेळी गाडीतून रस्त्यावर टाकून अज्ञातांनी पलायन केले असावे, अशी शक्यता क्षीरसागर यांनी व्यक्त केली. तातडीने तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र, महिलेच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे