शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यास गेलेल्या महिलेवर पोलीस ठाण्यात बलात्कार

By कुणाल गवाणकर | Updated: December 25, 2020 11:39 IST

पोलीस निरीक्षकानं बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप; चौकशी सुरू

शाहजहापूर: सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकानं बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहापूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी अपर पोलीस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जलालाबादमध्ये राहणारी एका ३५ वर्षीय महिलेनं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केल्याची माहिती पोलीस क्षेत्राधिकारी ब्रह्मपाल सिंह यांनी दिली. 'महिलेनं दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरला मदनपूरला जात असताना ती प्रवास करत असलेली ई-रिक्षा खराब झाली. त्यानंतर ती पायी चालू लागली. त्याचवेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी तिला जबरदस्तीनं शेतात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला,' असं सिंह यांनी सांगितलं.आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासाठी जलालाबाद पोलीस ठाण्यात गाठलं असता तिथे असलेल्या निरीक्षक विनोद कुमार यांनी खोलीत नेऊन बलात्कार केल्याचा दावा महिलेनं केल्याचं ब्रह्मपाल सिंह यांनी सांगितलं. पीडित महिलेनं बरेलीचे अपर पोलीस महासंचालक अविनाश चंद्र यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास गुन्हा कठोर कारवाई करण्याचं आश्वासन चंद्र यांनी दिलं.याआधी एटा जिल्ह्यातल्या बागवाला भागात महाविद्यालयात जात असलेल्या एका बीएससीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. दिवसाढवळ्या चालत्या टेम्पोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी बागवाला पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३६४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला आणि टेम्पो चालकाला अटक केली.

टॅग्स :Rapeबलात्कारGang Rapeसामूहिक बलात्कार