शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या शोधात महिलेने गमावले दागिने; फकीर बाबा निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 05:43 IST

बेपत्ता पतीचा शोध घेणाऱ्या महिलेचे दागिने एका फकीर बाबाने लुटल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. या प्रकरणी रविवारी पवई पोलिसांनी फकीर बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : बेपत्ता पतीचा शोध घेणाऱ्या महिलेचे दागिने एका फकीर बाबाने लुटल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. या प्रकरणी रविवारी पवई पोलिसांनी फकीर बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पवई परिसरात नेहा (नावात बदल) पती आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतात. १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. १५ तारखेला सकाळी त्या शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला. त्याने नेहा यांना चिंतेचे कारण विचारले.तिने पती बेपत्ता झाल्याचे सांगताच, फकिराने त्यांच्या हातावर चुना लावला. त्यावर पाणी ओतताच पाणी गुलाबी झाले. पुढे त्याच्याकडे दिलेले नारळ फोडताच त्यातून लाल रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे निघाल्याचे महिलेने पाहिले. तिचा बाबावरचा विश्वास वाढला. तेव्हा, फकिराने पती एका महिलेच्या नादी लागल्याचे सांगून उद्या येऊन उपाय सांगतो असे सांगितले.१६ तारखेला सकाळी बाबाने सांगितल्याप्रमाणे नेहाचे घर गाठले. बाबाने त्याच्याकडील चार खिळे दिले व घराच्या चार कोपºयांमध्ये पेपरमध्ये ठेवण्यास सांगितले. तसेच पतीला सोन्याचे पाणी पाजल्यानंतर तो व्यवस्थित होईल आणि पुढे कधीच घर सोडून जाणार नाही असे सांगितले. त्यानुसार, महिलेने अंगावरील दागिने काढून बाबाकडे दिले. त्याने मडक्यात ते दागिने टाकले. त्यात पीठ टाकून, मडके कपड्याने गुंडाळून सायंकाळी उघडण्यास सांगितले. त्याआधी उघडल्यास पती आणि मुलगा मरण पावतील अशी भीती घालून बाबा निघून गेला. सायंकाळी ५ नंतर तिने मडके उघडून बघितले असता, त्यात दागिने सापडले नाहीत.सीसीटीव्ही फूटेजसह गाठले पोलीस ठाणेमहिलेने परिसरात बाबाचा शोध सुरू केला. तेव्हा, १७ तारखेला एका कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये बाबा कैद झालेला दिसला. तिने हे फूटेज घेऊन १८ रविवारी पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फूटेजच्या आधारे ते फकीर बाबाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी