शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत धारदार शस्त्राने महिलेची हत्या; दुर्गंधी पसरल्याने समोर आली घटना

By नितीन पंडित | Updated: September 19, 2023 05:22 IST

या खोलीत ही महिला एकटीच राहत होती मात्र कधी कधी तिच्या सोबत आणखी एक महिला किंवा कधी कधी एक पुरुषही राहत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. 

भिवंडी - भिवंडी कल्याण सीमेवर असलेल्या कोनगाव गावातील शामबाग येथे असलेल्या येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री समोर आली आहे.

रात्री खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलोसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल होत खोलीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय महिलेची धारधार हत्याराने हत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेपर कटर जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

या खोलीत ही महिला एकटीच राहत होती मात्र कधी कधी तिच्या सोबत आणखी एक महिला किंवा कधी कधी एक पुरुषही राहत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. या हत्येचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह ,गुन्हे शाखा पथक,फॉरेन्सिक पथक व पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.