शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

रात्रीच्या अंधारात युवती भूत बनून घाबरवायची; भयभीत युवकाने जे केले त्याने सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 10:14 IST

या घटनेतील आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही

मॅक्सिको – तुम्ही कधी Prank व्हिडीओ पाहिले असतील ज्यात दुसऱ्याला भीती दाखवण्यासाठी बनावट भूताचा वापर केला जातो असाच काहीसा प्रकार करण्याच्या नादात एकाला जीव गमवावा लागला आहे. शेजाऱ्यांना भीती दाखवण्याची किंमत महिलेला स्वत:चा जीव देऊन मोजावी लागली आहे. महिलेने भयानक मेकअपनंतर सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये निर्जन रस्त्यावर एकटीच फिरत होती.

या महिलेला पाहून अनेकांना घाम फुटला परंतु एका व्यक्तीने थेट महिलेवर गोळीबार केला त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना मॅक्सिकोच्या नौकलपन डी जुआरेज येथे घडली आहे. पोलिसांनी मृत महिलेची ओळख सांगितली नाही. द सनच्या रिपोर्टनुसार, मृत महिलेचं वय २०-२५ वयोगटातील आहे. तिने लॅटिन अमेरिकेच्या La Liorona प्रमाणे स्वत:ला तयार केले होते.

दंतकथा आहे की, La Liorona ही एक भूत होती. जी तिच्या मुलांच्या आठवणीत रस्त्यावर रडत फिरत होती. मृत युवती अशाचप्रकारे रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर लोकांना घाबरवण्यासाठी फिरत होती. आसपास राहणाऱ्या लोकांनी अनेकदा तिचा व्हिडीओ बनवला आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, महिला खूप भयंकर मेकअप करत होती. ती जोरजोरात रडत ओ मेरे बच्चे असं ओरडायची. या युवतीला पाहून समोरील व्यक्ती इतका घाबरला की त्याने धडाधड तिच्यावर गोळ्या मारल्या ज्यात महिलेचा मृत्यू झाला.

या घटनेतील आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही. १५ ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेची चौकशी सुरु आहे. सध्या याबाबत काहीही सांगू शकत नाही. मॅक्सिकोत ३१ ऑक्टोबरला हॅलोवीन डे साजरा करण्याची तयारी सुरू होती. यावेळी लोकांना आत्मा आणि भूतांसारखे मेकअप करण्यात येतात. यात सहभागी झालेले स्वत: असे तयार होतात ज्याने इतरांनी त्यांना पाहताच भयभीत होतील. सोशल मीडियावर अशाप्रकारे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात ज्यात भूत बनून लोकांना घाबरवलं जातं. बरेच प्रँक पाहून लोकांना हसायला येते. परंतु मॅक्सिकोमधील या घटनेने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. इतरांना घाबरवायच्या नादात युवतीला जीव गमवावा लागला आहे.