शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News West Bengal: नाराज पतीला शोधत महिला शहरात आली; पुढे जे घडले ते भयावह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:34 IST

Gang Rape in West Bengal: गुरुवारच्या सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गंभीर अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली.

पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरात एका 25 वर्षीय विवाहितेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलेला रस्त्यावरून चालत असताना एका रिक्षात घालून जबरदस्तीने निर्मनुष्य जागी नेण्यात आले. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. महिलेवर वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

गुरुवारच्या सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गंभीर अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. तोवर या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने तिला वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती केले. 

जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. पीडितेने सांगितले की, तिचा पती भांडण करून घर सोडून निघून गेला होता. त्याच्या शोधासाठी ती वर्धमानला आली होती. तिचा पती वर्धमानमध्ये एका फॅक्टरीमध्ये काम करतो. बुधवारी सायंकाळी ती त्याच्या शोधासाठी शहरात दाखल झाली होती. तिने पती काम करत असलेली फॅक्टरी गाठली, परंतू तो तिथे सापडला नाही. यामुळे थकून भागून ही पीडिता वर्धमान स्टेशन भागात बसली होती. तेव्हा तिथे आणखी एक महिला बसली होती. हे पाहून ती तिच्या शेजारी बसली. तेवढ्यात तिथे एक टोटो रिक्षा (ई रिक्षा) आली. त्यामध्ये 6 लोक बसले होते, ते तिला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. 

शेजारी बसलेल्या महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी तिला मारहाण केली. ते लोक तिला अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पीडीतेने सांगितले की, त्या सहा लोकांनी तिचे आयुष्य बरबाद केले. तिला मारहाण केली. बलात्कारानंतर त्यांनी तिला चालत्या टोटोमधून बाहेर ढकलून दिले आणि पसार झाले. यात तिला गंभीर दुखापत झाली. वेदना होत असल्याने ती हॉस्पिटलला जाऊ शकली नाही. 

मोठी मारहाण, शरीरावर निशानतिला फुटपाथवरून हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या महिलांनी सांगितले की, पीडितेची हालत खूप खराब आहे. डोके, मान आणि छातीवर जागोजागी जखमा आहेत. तिच्या डोक्यावर मोठा घाव असून सूजही आली आहे. गाल आणि मानेवर खरचटले आहे. शरीराच्या अन्य अंगांवर मारहाणीचे व्रण आहेत. तिला चालताही येत नव्हते. कपडे फाटलेले होते. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल