शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, पवईच्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 01:42 IST

१९ लाख १३ हजार ८८८ रुपयांची रक्कम सदर महिलेने परत न करता बँकेची फसवणूक केल्याचे बँक प्रशासनाच्या निदर्शनास आले.

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण आयआयटी पवई येथे हॉस्टेल मॅनेजर असल्याची बतावणी करीत स्टेट बँक आॅफ इंडियाची १९ लाख १३ हजार ८८८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रणाली दिलीप चव्हाण (३९, पवई, मुंबई) हिला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. तिला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.प्रणाली हिने ठाण्यातील वागळे इस्टेट येथील मिलेनियम टोयाटो येथून कार घेण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नौपाडा शाखेतून १९ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेताना तिने आयआयटी, पवई येथे हॉस्टेल मॅनेजर म्हणून नोकरीला असल्याची बतावणी केली. त्यासाठी तिच्या नावाचे ओळखपत्र, तीन महिन्यांचे पगारपत्रक, नियुक्तीपत्र, आयआयटी पवईचे निवासस्थान असल्याचे पत्र, दोन वर्षांचे फॉर्म क्र. १६ अशी सर्व बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानुसार, ३ एप्रिल २०१९ रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नौपाडा शाखेत जाऊन तिने या कागदपत्रांच्या मूळ प्रतीही सादर केल्या.त्याआधारे तिला या बँकेमार्फत कारखरेदीसाठी १९ लाख ९० हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यातील ७६ हजार ११२ रुपयांची तिने बँकेला परतफेडही केली. मात्र, १९ लाख १३ हजार ८८८ रुपयांची रक्कम तिने परत न करता बँकेची फसवणूक केल्याचे बँक प्रशासनाच्या निदर्शनास आले.ही बाब निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या नौपाडा शाखेच्या उपव्यवस्थापक लक्ष्मी तावडे यांनी तिच्याविरुद्ध ७ आॅक्टोबर २०१९ रोजी अपहार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने प्रणालीला मुंबईतून १३ मार्च रोजी ताब्यात घेतले.न्यायालयाने सुुरुवातीला प्रणालीला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा ठाणे न्यायालयाने तिला आणखी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.पतीलाही घेणार ताब्यातआरोपीने प्रणाली चव्हाणने पतीच्या मदतीनेच बनावट कागदपत्रे बँकेत सादर करून कर्ज मंजूर करून घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे तिचा पती दिलीप चव्हाण यालाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक