शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह स्टोरीत जमिनीचा वाद आला; प्रेयसीनं प्रियकराला संपवून मृतदेह स्वत:च्या पलंगाखाली गाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:23 IST

चाकू भोसकून प्रियकराला संपवलं; मृतदेह स्वत:च्या बेडरुममध्ये गाडला

पूर्णिया: बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीनंच ही हत्या केली आणि प्रियकराचा मृतदेह तिच्या पलंगाखाली गाडला. घटना उघडकीस येताच आसपासच्या लोकांना धक्का बसला. संपूर्ण प्रकार पाहून पोलिसदेखील चक्रावले.

जमिनीचा वाद टोकाला गेल्यानंतर प्रेयसीनं प्रियकराची चाकू भोसकून हत्या केली. त्यानंतर तिनं त्याचा मृतदेह स्वत:च्या बेडरूममध्ये पलंगाखाली दफन केला. पूर्णिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे संपत पासवान एका आठवड्यापूर्वी बेपत्ता झाले. जमिनीचे व्यवहार करणाऱ्या संपत यांचं अपहरण झालं असावी अशी शंका कुटुंबियांनी होती. आता त्यांचा मृतदेह प्रेयसीच्या बेडरुममध्ये सापडला आहे. 

सरना चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या आशा देवी यांच्या घराची जमीन खोदून पासवान यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अवैध संबंध आणि जमिनीच्या वादातून संपत पासवान यांची हत्या झाल्याची माहिती एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी दिली. आरोपी आशा देवीनं संपत यांची हत्या करून त्यांचा मृतदेह स्वत:च्या घरात पलंगाखाली गाडून टाकला.

संपत पासवान बेपत्ता असल्याची तक्रार आठवड्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी नोंदवली. पोलिसांनी संपत यांचा सीडीआर चेक केला. त्यानंतर आशा देवीला ताब्यात घेण्यात आलं. तिला पोलिसा खाक्या दाखवल्यानंतर तिनं हत्येची कबुली दिली. जमिनीच्या वादातून आशा देवीनं तिच्याच घरात संपत यांची चाकूनं हत्या केली. त्यानंतर साथीदारांच्या मदतीनं संपत यांचा मृतदेह पलंगाखाली दफन केला. हत्या करण्याआधी संपत पासवान, आशा देवी आणि तिचे साथीदार घरात दारू प्यायले. पोलिसांना घरात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.