शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उद्या करणार मोठी पोलखोल; धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिला आणखी आक्रमक

By पूनम अपराज | Updated: January 15, 2021 16:21 IST

Renu Sharma And Dhananjay Munde : रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देरेणू शर्मा यांच्याविरोधात केलेले हनीट्रॅपचे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आज पत्रकार परिषदेस रेणू शर्मा हजर राहणार होत्या, मात्र त्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत. 

मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांच्या वकिलांनी ही आता गंभीर आरोप केला आहे. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी स्वत: ही माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. तसेच त्यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात केलेले हनीट्रॅपचे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आज पत्रकार परिषदेस रेणू शर्मा हजर राहणार होत्या, मात्र त्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत. 

गौप्यस्फोट! धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीणभावाविरोधात तक्रार 

रेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण? त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या 

रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच उद्या माध्यमांसमोर येऊन रेणू शर्मा पोलखोल करणार असल्याची माहिती देखील त्रिपाठी यांनी दिली. वकील रमेश त्रिपाठी यांना काल ७ वाजल्यापासून धमकीचे फोन येत आहेत. जवळपास ३० ते ४० कॉल आले असून मुंडेंच्या विरोधातील केस सोडण्यासाठी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली. अनेक नंबर मी ब्लॉक केले आणि काही नंबर रिसिव्ह करणं मी टाळतो अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे जीवास धोका असल्याने सुरक्षेची मागणीही त्रिपाठी यांनी केली आहे. तसेच आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही तर आम्ही कोर्टात जाणार असल्याची माहिती पुढे त्रिपाठी यांनी दिली. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल केली आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेRapeबलात्कारMumbaiमुंबईadvocateवकिल