शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Aryan ShahRukh khan Drug Case: आर्यन खानला जामिन मिळणार? शाहरुख खान उच्च न्यायालयात येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:44 IST

Aryan khan Drug Case LIVE Updates: काल हायकोर्टात गोंधळ उडाला होता. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. आज शाहरुख खान येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जसजशी मुंबई हाय कोर्टात आर्यन खानची सुनावणीची तारीख जवळ येत गेली तसतशी मुंबईत मोठमोठ्या घडामोडी घडत गेल्या आहेत. आर्यन खानच्या (Aryan Khan) चौकशीसाठी त्याला चारदा जामिन नाकारायला लावलेल्या एनसीबीच्या समीर वानखेडेंच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशातच आज आर्यन खानच्या जामिनावर दुसऱ्या दिवशीची सुनावणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे. 

आर्यन खानला अटक झाल्यापासून कुठेही न दिसलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) काही दिवसांपूर्वी त्याला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता. आता आज तो आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीला हाय कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

काल काय घडले...आर्यन खानला सोडविण्यासाठी माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची मोठी टीम कार्यरत आहे. एनसीबीकडून आर्यन खानला जामिन का मिळू नये, यावर बाजू मांडली जात आहे. यावेळी एनसीबीने पूजा ददलानीचे नाव घेतले आहे. प्रभाकरच्या अॅफिडेव्हिटमुळे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचे नाव जोडले गेले आहे. यामुळे पूजा ददलानीने तपासावेळी साक्षीदारांना प्रभावित केले आहे. साक्षीदारांना अशाप्रकारे फोडले जात असल्याने आर्यन खानचा जामिन रद्द करण्यासाठी एक महत्वाची बाब म्हणून पहावे, असे एनसीबीच्या वकिलांनी म्हटले आहे. 

हायकोर्टात गोंधळ उडाला होता. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढले यानंतर पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला आणि सुनावणी पुढे सुरु झाली. यावेळी रोहतगी यांनी आर्यन खान हा त्या पार्टीत पाहुणा म्हणून गेला होता, असे म्हटले आहे. आता आज यापुढील सुनावणी सुरु होणार आहे. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीHigh Courtउच्च न्यायालय