शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नीचं खरं नाव उघड झालं; ऐकून पतीला जबर धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:16 IST

१२ वर्षापूर्वी पूजानं जगवीरशी लग्न केले होते. या दोघांना आयुष आणि शगुन अशी दोन मुले आहेत.

अयोध्या - लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नीचं खरं नाव समजल्यानंतर पतीला धक्का बसला. पत्नीचं नाव समोर येताच आता पतीला इस्लाम कबूल करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर इस्लाम कबूल केला नाही तर शिरच्छेद करू अशी धमकी पतीला देण्यात आली आहे. पतीनं याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली. 

१२ वर्षापूर्वी पूजानं जगवीरशी लग्न केले होते. या दोघांना आयुष आणि शगुन अशी दोन मुले आहेत. लग्नाच्या १२ वर्षांनी आता पूजा ही पूजा नसून ती हसीना बानो असल्याचा धक्कादायक खुलासा पतीसमोर झाला. इतकेच नाही तर २ वर्षापूर्वी जेव्हा मुलाचं शाळेत नाव नोंदवण्यात आले तेव्हा पूजा उर्फ हसीना बानोने मुलगा आयुषचं नाव अनील असं लिहिल्याचंही उघड झाले. आयुषचं संधी साधून खतनाही करण्यात आले. आता जगवीरनं या सर्व गोष्टींना विरोध केला असता त्याला इस्लाम धर्म स्वीकार अन्यथा शिरच्छेद करू अशा धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला परंतु जीवाच्या भीतीपोटी आता जगवीरनं संत-महंतांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.  

नेमका काय आहे प्रकार? जगवीर यांचे दाजी रामजन्म कोरी यांना १२ वर्षापूर्वी फैजाबाद रेल्वे स्टेशनबाहेर एक युवती भेटली. तिने तिचं नाव पूजा सांगितले आणि घरात कुणीही नसल्याचं बोलली. रामजन्म कोरी यांनी या मुलीचं लग्न जगवीरसोबत लावून दिले. सुरुवातीला कोर्ट मॅरेज केल्यानंतर जगवीर आणि युवतीने हिंदु पद्धतीने विवाह केला. यात मुलीकडून कुणीही सहभागी झालं नव्हतं कारण तिला कुटुंब नव्हतं. लग्नाच्या काही महिन्यांनी आयुषचा जन्म होता जो सध्या १० वर्षाचा आहे. त्यानंतर शगुन नावाची कन्याही जन्माला येते. 

एकेदिवशी पत्नी पूजा मुलांसह नमाज पठण करताना जगवीरला दिसली तेव्हा तिच्यावर संशय आला. जगवीर आणि पत्नीमध्ये वाद झाला त्यानंतर पत्नी प्रतापगडला माहेर असल्याचं सांगत निघून गेली. काही काळाने पत्नी परतली तेव्हा आयुषचं खतना केल्याचंही उघड झाले. त्यानंतर हसीना बानोचे आई वडील स्थानिक दबंग राजू उर्फ नसीर जगवीरच्या घरी पोहचून त्याला मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. जर मुस्लीम धर्म स्वीकारला नाही तर शिरच्छेद करू अशी धमकी देण्यात आली. सध्या जगवीरच्या आरोपांवरून पोलिसांनी नसीरला अटक केली आहे.