शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा खून करून बायकोने ठोकली धूम; नाशिकमध्ये घडली घटना;  दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

By अझहर शेख | Updated: September 24, 2022 22:55 IST

दरवाजाला कुलुप असल्याने काका-पुतण्यांनी मिळून कुलुप तोडले असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली.

नाशिक : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळागावातील माळी गल्ली- कोळीवाडा रस्त्यावर एका खोलीत राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये झालेल्या वादातून पत्नीने आपल्या पतीचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिलीप रंगनाथ कदम (५४) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून त्याचा मृतदेह पोलिसांना घरातून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

इंदिरानगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडाळागावातील माळी गल्ली- कोळीवाडा रस्त्यावर एका खोलीत भाडेतत्वावर कदम दाम्पत्य राहत होते. कदम हे दहीपूल येथे दुचाकींची दुरूस्ती करत आपला उदरनिर्वाह चालवित होते. त्यांनी दुसरे लग्न केल्यामुळे मुलगादेखील त्यांच्यापासून मागील काही महिन्यांपासून वेगळा राहत होता. ते आपल्या पत्नीसमवेत वडाळागावात वास्तव्यास होते. मागील दोन दिवसांपासून भाऊ भेटला नाही, म्हणून त्यांच्या भावाने शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घर गाठले.

यावेळी मुलगा रोशन हादेखील तेथे आला. दरवाजाला कुलुप असल्याने काका-पुतण्यांनी मिळून कुलुप तोडले असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. दिलीप कदम हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळले. यावेळी त्यांनी इंदिरानगर पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करत मृतदेह त्वरित जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी कदम यांचा मुलगा रोशन याच्या फिर्यादीवरून रात्री उशीरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Nashikनाशिक