शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गर्भपात करून काढले घराबाहेर, धानोरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 02:01 IST

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करून तिला वाढदिवशीच घरातून हाकलून देणाऱ्या डॉक्टर पतीसह सात जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करून तिला वाढदिवशीच घरातून हाकलून देणाऱ्या डॉक्टर पतीसह सात जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़डॉ़ सुधीर मारुती बनसुडे, सासरा मारुती बनसुडे, सासू केशर बनसुडे, दीर राहुल बनसुडे, जाऊ स्वाती बनसुडे (सर्व रा़ ब्रम्हा स्काय सोसायटी, खेसे पार्कजवळ, धानोरी), तसेच नणंद वैशाली राऊत, पतीचा मामा हरिभाऊ भोसले अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत़याप्रकरणी उज्ज्वला सुधीर बनसुडे (वय २६, रा़ वानवडी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ हा प्रकार एप्रिल ते १६ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडला आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले, की त्यांच्या लग्नात उज्ज्वला यांच्या घरच्यांनी सात तोळे सोने, भांडी दिली होती; पण हुंडा दिला नव्हता़ त्यामुळे लग्नानंतर त्यांचे पती डॉ़ सुधीर बनसुडे यांनी क्लिनिक टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी धमकावू लागले़ त्यांच्या वडिलांनी आपल्या भविष्यनिर्वाह निधीतून ५ लाख रुपये काढून ते जावयाला दिले़ त्यातून त्यांनी लोहगाव येथे नवीन क्लिनिक सुरू केले़ क्लिनिकसाठी त्यांचे दोन तोळे दागिनेही मोडले़ त्यांना दिवस गेल्यावर सुधीर याने बळजबरीने त्यांना कसले तरी औषधे देत़ त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता़ दोन महिन्यांच्या गर्भवती असताना कसल्या तरी गोळ्या खाऊ घातल्या़ त्यातून रक्तस्राव झाल्यावर त्यांना धानोरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करून ३० जुलैला त्यांचा गर्भपात घडवून आणला़ महिला साह्य कक्षातही त्याने तडजोड करण्यास नकार दिल्याने शेवटी उज्ज्वला यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक एस़ एस़ रासकर अधिक तपास करीत आहेत़वाढदिवशी केली मारहाण१४ सप्टेंबरला गौरीपूजन झाल्यावर त्यांच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले़ १६ सप्टेंबरला उज्ज्वला यांचा वाढदिवस होता़ त्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता सर्व जण वाढदिवस असणाºया व्यक्तीला शुभेच्छा देतात़ इथे उलट उज्ज्वला यांना सुधीरने मारहाण करून जबरदस्तीने कपड्याची बॅग भरायला लावली आणि घरातून हाकलून दिले़ त्यांनी वडिलांबरोबर जाऊन लोहगाव पोलिसांकडे तक्रार दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी