शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

करवा चौथचा चंद्र पाहिला मग पोलिसांना फोन करुन पतीला जेलमध्ये पाठवलं; सगळंच अचंबित घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:50 IST

पत्नीने रात्री करवा चौथ सणाच्या दिवशी आरोपी पती राजीव गुलाटीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवलं होतं.

ठळक मुद्देपतीने केलेल्या कृत्याला पाहून तिने पोलिसांना फोन करुन पतीला अटक करण्यास सांगितले.नजफगड परिसरात कैलास नावाच्या महिलेला राजीव गुलाटीने गोळी मारली त्यात महिलेचा मृत्यू झाला.आरोपीला कॉलरला पकडून बाहेर आणलं आणि अटक केली.

नवी दिल्ली – देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या नजफगड परिसरात एका घटनेने सगळ्यांना हैराण केले आहे. याठिकाणी एका महिलेने पोलिसांना फोन करुन स्वत:च्या पतीलाच अटक करायला लावलं आहे. महिलेच्या पतीने एका वृद्ध महिलेचा खून केला असून तो सध्या घरीच आहे. त्याला अटक करा परंतु मारु नका, मी त्याच्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवलंय असं महिलेने फोनवरुन सांगितले.

खूनी पतीला पकडण्यासाठी पत्नीचा पोलिसांना फोन

दिल्लीच्या नजफगड परिसरात एका वृद्ध महिलेची गोळी मारुन हत्या आणि तिच्या मुलीला हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी राजीव गुलाटी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीच्या पत्नीनेच पोलिसांना फोन करुन पती हत्या करुन घरीच असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मी पतीसाठी करवा चौथ व्रत केलय – आरोपीची पत्नी

पत्नीने रात्री करवा चौथ सणाच्या दिवशी आरोपी पती राजीव गुलाटीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवलं होतं. मात्र पतीने केलेल्या कृत्याला पाहून तिने पोलिसांना फोन करुन पतीला अटक करण्यास सांगितले. खूनी पती घरीच असून त्याला सरेंडर करायचं आहे. परंतु पतीला मारू नका, आज करवा चौथ आहे. मी पतीसाठी व्रत ठेवलंय असं आरोपीच्या पत्नीने पोलिसांना फोनवरुन सांगितले.

यावेळी द्वारका परिसरात गस्त घालणाऱ्या डीसीपी शंकर चौधरी, ज्वाइंट सीपी यांच्यासोबत आरोपीच्या घरी पोहचले त्यांनी आरोपीला कॉलरला पकडून बाहेर आणलं आणि अटक केली. नजफगड परिसरात कैलास नावाच्या महिलेला राजीव गुलाटीने गोळी मारली त्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी राजीव गुलाटीने कैलासच्या मुलीलाही गोळी मारण्याचा प्रयत्न केला. सध्या या मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ती जीवन मृत्यूशी संघर्ष करत आहे. दोन लाखाच्या आर्थिक देवाणघेवाणीवरुन कैलास आणि राजीव गुलाटी यांच्यात वाद झाला होता. याच कारणावरुन राजीवने कैलास या महिलेला गोळी मारुन ठार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

टॅग्स :delhiदिल्ली