शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

इराणी म्हणतायेत काय कुणाची भीती? आंबिवलीतील इराणी वस्तीची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 08:47 IST

मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो.  काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले  होते.

- मयुरी चव्हाण

कल्याण : कल्याण नजीक असलेल्या आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील  अट्टल गुन्हेगारांची  वस्ती असलेला इराणी काबीला हा नेहमीच  पोलिसांच्या  हीटलिस्ट वर राहिला आहे.काबिल्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर  हल्ले  होण्याचे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत.त्यामुळे या  काबिल्यांची  दहशत मोडीत  काढताना पोलिसही हतबल  झाले आहेत. या परिसरात नुकतीच पोलिसांसमोरच दोन गटात तुंबळ  हाणामारी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे इराणी   काबिल्यांची  दहशत ही दिवसेंदिवस वाढतच असल्याची  जोरदार  चर्चा  सुरू आहे. 

मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो.  काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले  होते. आंबिवलीमध्ये  इराणी नागरिकांनी स्वतःची घरे घेतली असून  या  ठिकाणी 200-250 घरे असल्याचा अंदाज पोलिसांनी  व्यक्त केला आहे. येथील नागरिक बलुची भाषा बोलत असल्यामुळे  कारवाईसाठी गेलेल्या  पोलिसांना  ही भाषा समजत नाही. तसेच पोलिसांकडे पाहून इराणी महिला बलुची भाषेत  अर्वाच्य शब्दही वापरतात  अशी माहितीही  समोर आली आहे.गॉगल  व इतर प्रकारचे चष्मे विकण्याचा व्यवसाय करणारे इराणी हे  सोनसाखळी व  इतर दागिनेही चलाखीने  लंपास करण्यात त्यांचा हातखंडा आहेत अट्टल सोनसाखळी  चोर  हे  चो-या करून  स्टेशनजवळ  असलेल्या  कबिल्यात लपून  बसतात. गुन्हेगारीमध्ये   बहुतांश तरुण  सक्रिय असून  उंच व  धिपाड  अशी या  तरुणांची शरीरयष्टी आहे.  

        कबिल्यातील मुलांना शिक्षणात रस नसून गुन्हेगारीत करियर करण्याकडे या नागरिकांचा ओढा आहे. समन्वय साधून पोलिसांनी येथील नागरिकांना  जीवनाच्या मुख्य  प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे सुधारण्याची संधी देऊनही काबिल्याने  ती धुडकावली.कल्याण कसारा मार्गावर सोनसाखळी चोरीच्या अनेक  घटना घडत असतात.चोरी केली की  लागलीच  स्टेशन जवळ असलेल्या काबिल्यात  चोर पळ काढतात . पोलीस कारवाईसाठी आले  तर त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी रॉकेलचे डब्बे , रॉड व इतर साहित्यही काबिल्यात उपलब्ध असते. त्यामुळे हे काबिले गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान झाले असून   काबिल्याची दहशत मोडून  काढणे हे पोलिसांसमोर  मोठे आव्हान आहे.

 दागिन्यांचा मोहसोनसाखळी चोरी करण्यात  इराणी  तरबेज आहेत. इराणी टोळ्यांना  धूम स्टाईल , हातचलाखीने महिलांचे दागिने  लंपास करण्याकडे या टोळ्यांचा अधिक कल आहे. अनेक वॉन्टेड  सोनसाखळी चोर हे आंबिवली येथील काबिल्यात राहतात.  दागिने चोरी केले किती  इराणी महिला  दागिने  विकण्याचे काम करतात. तसेच काबिल्यात पोलीस आल्यावर  त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी महिलाच पुढे जातात. त्यानंतर आरोपीना  जामीन देण्याचे  कामही महिलाच  करतात.

* घरामध्ये स्वयंपाकाचे   सामान  नाहीअनेकदा पोलिसांनी आंबिवली  येथील   इराणी वस्तीत छापा टाकल्यावर  त्यांना या ठिकाणी स्वयंपाकाचे सामान कधीच आढळून आले नाही.   इराणी नागरिक घरात  स्वयंपाक करत नसून  बाहेरच  खाद्यबभ्रमंती करत असल्याचे  पोलीस सूत्रांनी  सांगितले. विशेष म्हणजे हायफाय कॉस्मेटिक्स आणि   कपडेच  इराण्यांच्या घरात असतात.

चोरीच्या आयडिया-  हातचलाखी आणि नागरिकांना  गोंधळून  टाकणे- दागिने पॉलिश  करून देण्याचा बहाणा-  बँकेत  सावज शोधून पैसे मोजून   देण्याचा बहाणा-  दागिने पिशवी ठेवा , पुढील चौकात दंगल चालू असल्याची नागरिकांना  थाप

इराणी  काबिल्यांची दहशत ही वाढत चालली नसून कमी।झालेली आहे. गेल्या दोन तीन वर्षांत पोलीस प्रशासनाने या संदर्भात  सहा ते सात मोक्का कलम लावले आहेत. या दोन वर्षात  काबिल्यामधील  जवळपास 50 आरोपी हेे बाहेरच्या राज्याांना पकडून दिले आहेत. पोलिसांना माहिती देणारे व न देणारे असे दोन गट या इराणी वस्तीत तयारझाल्याने दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. - विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ 3

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरी