शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता कुणाचीही असो, अधिराज्य आमचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:58 IST

प्रामाणिकपणाचा आव आणून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बंटी-बबलीला राजकीय नेत्यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी वाढली होती. सत्ता कुणाचीही असो आमचेच अधिराज्य चालणार, असा दावा ते करीत होते. परंतु शहर पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. रोज होत असलेल्या नवनव्या खुलाशांमुळे अनेकांवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रामाणिकपणाचा आव आणून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बंटी-बबलीला राजकीय नेत्यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी वाढली होती. सत्ता कुणाचीही असो आमचेच अधिराज्य चालणार, असा दावा ते करीत होते. परंतु शहर पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. रोज होत असलेल्या नवनव्या खुलाशांमुळे अनेकांवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता दिसत आहे.बंटी-बबली शिताफीने आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवत होते. ज्यांचा पोलीस आणि प्रशासनावर वचक आहे किंवा जो चांगली मिळकत असलेल्या विभागाची कमान सांभाळतो, अशा नेत्यांना आधी ते आपल्या जाळ्यात ओढायचे. त्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून वसुली, ब्लॅकमेलिंग, जमिनीवर ताबा मिळविणे, बदली करणे, कंत्राट किंवा परवाना मिळवून देण्याचा गोरखधंदा करीत होते. दहा वर्षांपूर्वी परिवहन विभागातील अधिकाऱ्याचा आश्रय मिळाल्यानंतर ओव्हरलोडच्या वसुलीमुळे बंटी मालामाल झाला. सत्ता परिवर्तनानंतर तो रेती तस्करी, अबकारी लायसन्स किंवा कंत्राट मिळवून देण्याचे तसेच अधिकाऱ्यांची बदली करण्याचे काम करीत होता. बंटी मुख्य व्यक्तीचा खास असल्यामुळे अधिकाºयांना आपण फसविले जाणार नाही याची शाश्वती होती. पैसे दिल्यानंतर वर्षभर संबंधित अधिकारी बंटीकडे बदलीसाठी चकरा मारीत होते. काम न झाल्यामुळे मध्यस्थाने पैसे परत मागितले असता बंटीने त्यास धमकी दिली. बंटीला माहीत होते अधिकाºयाने तोंड उघडल्यास तो सुद्धा फसू शकतो. बंटीचा मानकापूर ठाण्याच्या परिसरात आलिशान बंगला आहे. हा बंगला वादग्रस्त जागेवर बांधला आहे. जमीन एका धार्मिक संस्थेच्या नावे आहे. बंटीने आपल्या प्रभावामुळे या जमिनीचा ताबा घेतला. त्याने इतर नागरिकांनाही जमीन बळकावण्यासाठी मदत केली. जमिनीचे मूळ मालक असलेल्या धार्मिक संस्थेने मानकापूर पोलीस आणि नासुप्रकडे तक्रारही केली. संस्थेचे पदाधिकारी जमिनीची माहिती घेण्यासाठी गेले असता मानकापूर पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. नासुप्रनेही तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही. बंटीच्या सांगण्यानुसार या जमिनीच्या परिसरात शासकीय निधीतून रस्ता आणि विजेचे खांब लावण्यात आले. बंटी-बबलीपासून त्रस्त असलेले नागरिक आता कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकरच्या धर्तीवर या अवैध बंगल्यावर कारवाईची मागणी करीत आहेत.कशी झाली आर्थिक प्रगतीबंटी एकेकाळी ऑटो डीलरचे काम करीत होता. दोन-चार दुचाकींची विक्री करून तो उदरनिर्वाह चालवित होता. त्यानंतर एका नेत्याकडे त्याने सेल्समनचे काम केले. त्यावेळी तो रेशीमबागमध्ये राहत होता. एका प्रकरणात अडकल्यामुळे तो खरबी येथे राहण्यासाठी निघून गेला. अनेकांची फसवणूक करून तो मालामाल झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने लक्झरी एसयुव्ही बुक केली. कमाईचे स्थायी साधन नसताना त्याने केलेली आर्थिक प्रगती तपासाचा भाग आहे.डॉक्टरची भूमिका महत्त्वाचीसूत्रांनुसार बंटी-बबलीच्या प्रगतीत शासकीय डॉक्टरची भूमिका महत्त्वाची आहे. तो दोघांच्या सांगण्यावरून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संपत्ती गोळा करीत होता. या डॉक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आश्रय होता. जाणकारांच्या मते त्यांच्या संबंधांचा बारकाईने तपास केल्यास अनेक धक्कादायक बाबी पुढे येऊ शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी