शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: आर्यन प्रकरणातील धुळ्याचा ‘तो’ सुनील पाटील कोण? दिवंगत गृहमंत्र्यांचा मानसपुत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 06:31 IST

Aryan Khan Drug case: मुंबईलगत समुद्रामध्ये एका क्रूझवर ड्रग्ज असल्याची टीप सॅम डिसुझा नावाच्या व्यक्तीने एनसीबीला दिल्याचे आतापर्यंत सांगण्यात आले. परंतु आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय आरोप - प्रत्यारोप होऊन हे प्रकरण अधिक चिघळल्याने सॅम डिसुझाने हात वर केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क    धुळे : बहुचर्चित आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या धुळ्यातील  सुनील पाटील नामक व्यक्तीची सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. हा सुनील पाटील नेमका कोण, हाच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.  

मुंबईलगत समुद्रामध्ये एका क्रूझवर ड्रग्ज असल्याची टीप सॅम डिसुझा नावाच्या व्यक्तीने एनसीबीला दिल्याचे आतापर्यंत सांगण्यात आले. परंतु आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय आरोप - प्रत्यारोप होऊन हे प्रकरण अधिक चिघळल्याने सॅम डिसुझाने हात वर केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धुळ्याच्या सुनील पाटील नामक व्यक्तिचा उल्लेख केला. त्यानंतर धुळे जिल्ह्यात तो सुनील पाटील कोण, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.  

धुळ्यातील एका प्रसिद्ध सुनील पाटील नामक व्यक्तीने मी ‘तो’ सुनील पाटील नसल्याचे जाहीर केले आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक सुनील पाटील आहेत. त्यामुळे हा सुनील पाटील नेमका कोण, या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्यांना मिळेनासे झाले आहे. परंतु राज्याच्या एका दिवंगत गृहमंत्र्यांचा मानसपुत्र म्हणून ओळख असलेल्या या व्यक्तीचे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध असून, तो काही वर्षांपासून धुळ्यात राहत आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी