शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:21 IST

अहमदाबादच्या चांदखेडा येथील दोन मुलींच्या मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक खुलासा. डोसा खाल्ल्याने नाही तर विषप्रयोगामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचे एफएसएल रिपोर्टमध्ये समोर आले आहे

अहमदाबादच्या चांदखेडा परिसरात दोन चिमुरड्या मुलींच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला ज्या घटनेला फूड पॉयझनिं समजले जात होते, ती प्रत्यक्षात अन्नातून दिलेले विष असल्याचे एफएसएल अहवालातून स्पष्ट झाले आहे. या घटनेने संपूर्ण गुजरात हादरले असून पोलीस आता हत्या की सामूहिक आत्महत्या, या दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.

डोसा खाल्ला अन् होत्याचे नव्हते झाले!

१ एप्रिलच्या रात्री विमल प्रजापती याने बाहेरून तयार डोशाचे पीठ आणले होते. घरात डोसे बनवून सर्वांनी खाल्ले, मात्र त्यानंतर काही वेळातच संपूर्ण कुटुंबाची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. 'एफएसएल'च्या अहवालानुसार, या मुलींचा मृत्यू अन्नाच्या विषबाधेमुळे नाही, तर त्यांच्या शरीरात विषारी घटक गेल्यामुळे झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलींचे वडील विमल आणि आई भावना यांच्या रक्ताच्या नमुन्यातही तेच विषारी घटक सापडले आहेत.

सल्फासच्या गोळ्यांचे रहस्य काय?

तपासादरम्यान पोलिसांना विमलच्या घरातून 'सल्फास'च्या गोळ्या सापडल्या आहेत. हे कीटकनाशक साधारणपणे धान्य साठवण्यासाठी वापरले जाते. हेच विष डोशाच्या पिठात आधीच होते की कुणी जाणीवपूर्वक त्यात मिसळले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मुलींच्या आजोबांचे मेडिकल स्टोअर असल्याने, हे विष तिथून आले का? याचीही चौकशी सुरू आहे.

पित्यावर संशयाचे मळभ; तणाव की विवंचना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल प्रजापती हा गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची त्याची इच्छा होती आणि तो ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत होता. आर्थिक तंगी आणि घरगुती कलहामुळे तो तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच, मुलाच्या आशेपोटी दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्याने कुटुंबात वाद होते का, या कोनातूनही तपास सुरू आहे.

सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्सवर नजर

गुन्हे शाखेने आता स्थानिक औषधांची दुकाने आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. विमल आणि भावना सध्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती आहेत. विमलची प्रकृती स्थिर असली तरी भावनाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आई-वडील शुद्धीवर आल्यानंतरच या मृत्यूच्या रात्रीचे नेमके रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीahmedabadअहमदाबाद