शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बेपत्ता महिला जातात तरी कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 09:43 IST

- मीरा बोरवणकर माजी पोलिस महासंचालक, संशोधन व विकास विभाग  शातील बेपत्ता महिलांची जाहीर झालेली आकडेवारी पाहता हा विषय ...

- मीरा बोरवणकरमाजी पोलिस महासंचालक, संशोधन व विकास विभाग 

शातील बेपत्ता महिलांची जाहीर झालेली आकडेवारी पाहता हा विषय किती गंभीर आहे, याची जाणीव होते. हा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याची आवश्यकता आहे. याबाबत कोणता एक विशिष्ठ घटक कारणीभूत आहे, असे नव्हे. हा एक सामाजिक प्रश्न असून तो सोडवण्यासाठी अनेक घटकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे.

महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे जाणून घेत त्यातील शक्य ती नेस्तनाबूत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहायला हवी. महिला आणि मुली बेपत्ता  होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. काही वैयक्तिक असतात तर काही कौटुंबिक. काही घटनांमागे गुन्हेगारीचे रॅकेट असते. बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतात आणि त्यात काही गुन्हेगारी रॅकेटचा संबंध असेल तर त्यादृष्टीने कारवाई केली जाते. बेपत्ता झाल्यावर महिलांचा शोध घेण्यासाठी धावपळ करण्याऐवजी तसे घडणारच नाही, यासाठी काय करावे लागेल, याचा विचार आणि कृती आता व्हायला हवी.

अनेक मुली घरात नाखूश असतात. ज्याच्यासोबत तिला विवाह करायचाय त्यासाठी कुटुंब मान्यता देत नाही. त्यामुळे त्या घराचा त्याग करतात. काही महिला, मुलींना महानगरीय जीवनशैलीचे आमिष दाखवून फूस लावली जाते. शहरी समृद्धीसोबत ऑनलाइन घडामोडींचा सोशल मीडिया हेही गायब होण्याचे एक कारण बनले आहे. काही कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात तर काही चांगल्या जीवनाच्या शोधात घराबाहेरची वाट धरतात. जग बदलत असताना आणि मुली व महिला इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करत असताना, कुटुंबे बदललेली नाहीत. बऱ्याच मुलींना अधिक स्वातंत्र्य हवे असते. त्यामुळे त्या घरातून निघून जातात.

आता आपण एकूण आकडेवारी पाहिली तर बेपत्ता महिला तसेच मुलींचे प्रमाण धास्तावून टाकणारे आहे, हे खरे. मात्र पोलिसांना येणारा अनुभवही येथे नमूद करावा लागेल. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस त्या व्यक्तीच्या शोधासाठी प्रयत्न करतात. काही दिवसांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तिचा ठावठिकाणा समजला अथवा ती व्यक्ती परत आली तरी तसे पोलिसांना कळवून तक्रार मागे घेण्याचे कष्ट कुटुंबीयांकडून घेतले जातातच, असे नाही. तसे न झाल्यामुळे ती व्यक्ती पोलिस रेकॉर्डवर कायमचीच बेपत्ता राहते. 

समस्या हाताळण्याऐवजी... सामाजिक समस्या हाताळण्याऐवजी पोलिसांवर आरोप केले जातात आणि खूप अपेक्षाही व्यक्त केल्या जातात. शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची निश्चितच आहे; पण मुळात त्या बेपत्ताच होऊ नयेत, यासाठी समाज जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवेल? पंचायत, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्थांनी प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. 

मानवी तस्करीचा धोकाबेपत्ता महिला किंवा मुली पसंतीच्या पुरुष, मुलांसोबत, रेल्वेस्थानक, बस स्टँडसह सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी सापडतात. काही वेळा वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकल्याचेही आढळते. अशा प्रकरणांमध्ये तरुण मुली आणि महिलांचे लैंगिक हेतूंसाठी शोषण आणि मानवी तस्करी या सर्वात धोकादायक समस्या आहेत. मुली, महिलांचे शोषण, मानवी तस्करी आदींसारखी गुन्हेगारी असेल तेव्हा पोलिसांना नक्कीच प्रतिसाद द्यावा लागतो; परंतु, ते नंतर तपासात पुढे येते.  मला वाटते की, कुटुंब आणि स्थानिक समुदायांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत; पण केवळ कायदे करून महिला सुरक्षित राहतीलच, असे नव्हे. उपलब्ध आकडेवारी हेच दर्शवते. 

तीन वर्षांत १३ लाख महिला बेपत्तादेशामध्ये २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत

१३,००००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या. सर्वात जास्त महिला मध्य प्रदेशातील असून त्या खालोखाल पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. 

अठरा वर्षाहून अधिक वयाच्या १०,६१,६४८ आणि त्याहून कमी वयाच्या 

२,५२,४३० मुली या काळात बेपत्ता झाल्या. 

१,७८,४००महिला आणि 

१३,०३३ मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत दिली आहे.

टॅग्स :Womenमहिला