शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मारिया खान कुठेय?; तक्रारीसाठी आली आणि गायब झाली, ९० दिवसाची मिसिंग मिस्ट्री

By मनीषा म्हात्रे | Updated: August 20, 2023 20:08 IST

भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मारिया खान ही उच्च शिक्षित असून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते

मुंबई : पती पत्नीतील वाद पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांना बोलावून समजूत काढली. त्यानंतर, दोघे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. मात्र, ती घरी परतली नाही. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेरून बेपत्ता झालेली मारिया खान नेमकी कुठे गेली? याचे गूढ ९० दिवस उलटूनही समोर आलेले नाही. याबाबत भोईवाडा पोलीस तिचा शोध घेत आहे.

भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मारिया खान ही उच्च शिक्षित असून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. २०१९ मध्ये तिचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अक्रमशी विवाह झाला. लग्नानंतर ती गोवंडीत राहण्यास गेली. फेब्रुवारी महिन्यात अचानक अक्रम तिला घेऊन घरी धडकला.  मारियाचे अन्य मुळाशी प्रेम संबंध असल्याचे सांगत तिला माहेरी सोडून निघून गेला. दोघांमध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोघांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. पोलिसांनीही त्यांच्यात समजूत काढण्याचा प्रयत्न केला. १८ मे रोजी दोघांनाही भोईवाडा पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. दोघांना पोलिसांनी समजावून एकमेकांशी संवाद साधण्यास सांगितले. त्यानंतर, दोघेही बाहेर पडले.

मात्र,  मारिया घरी आली नाही. मोबाईलही पोलीस ठाण्याच्या टेबलवर सोडून ती गायब झाली. बराच वेळ झाला तरी ती न परतल्याने कुटुंबीयांनी फोन कारण्यास सुरुवात केला. फोन पोलीस ठाण्यातच मिळून आला. सीसीटीव्हीमध्येही ती बाहेर जाताना दिसते. अखेर, २१ तारखेला कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हरवल्याची नोंद करत तपास सुरु केला. मात्र ९० दिवस उलटले तरी मुलीचा शोध लागत नसल्याने कुटुंबियांकडून तपासावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बायको गायब, पती शादी डॉट कॉमवरमाझी बहीण नेमकी कुठे गेली? तिचे नेमके काय झाले? असे अनेक प्रश्न आम्हाला त्रास देत आहे. हवा तसा तपास होताना दिसत नाही. बहिणीचा शोध सुरु असताना तिच्या पतीने शादी डॉट. कॉम वर दुसऱ्या पत्नीचा शोध सुरु केल्याचीही माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आमचा संशय वाढत आहे. पोलिसांनी थोडी कठोर पावले उचलत बहिणीचा शोध घेणे गरजेचे आहे. -  अल्तमश, परदेशात राहणारा मारियाचा भाऊ

तपास सुरुमारिया खान यांचा तपास सुरु आहे. संबंधितांकडे चौकशीही सुरु आहे.  पथक त्यांचा शोध घेत असल्याचे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी