शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

घरात पोहचला तेव्हा बॉयफ्रेंडसोबत सापडली पत्नी; नाराज पतीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:11 IST

युवकाने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडवर छळल्याचा आरोप केला.

राजस्थानच्या भिलवाडा येथे पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत खुलासा झाल्यानंतर त्रस्त झालेल्या पतीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून होणाऱ्या त्रासामुळे ४२ वर्षीय कमल कलवानीने मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला. सुसाईड करण्यापूर्वी पतीने एक व्हिडिओही बनवला होता. ज्यात पत्नीच्या अफेअरचा उल्लेख केला होता. 

युवकाने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडवर छळल्याचा आरोप केला. राजस्थानातील भिलवाडा येथील ही घटना आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. मंगळवारी रात्री एका युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. मृतकाच्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांना दुर्घटनेबाबत कळवण्यात आले. 

आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडिओया प्रकरणात अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, मृत व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून खुनाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचवेळी, पोलिसांना मृताच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ देखील सापडला आहे, ज्यामध्ये मृताने पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे विचलित झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं कारण सांगितलं. 

तरुणाने व्हिडिओमध्ये आरोप केला आहे की, माझ्या पत्नीचे अफेअर आहे आणि मी तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडले, त्यानंतर मला सतत धमक्या येत आहेत. पत्नीने देशातील कायदा महिलांच्या बाजूने आहे  असं सांगत तू काहीही करू शकत नाही, असं म्हटलं. तेव्हापासून तिचा प्रियकर आणि कुटुंबीय मला सतत धमक्या देत आहेत. त्याचबरोबर पत्नीने घरात भांडण आणि मारहाण केल्याचा आरोपही मृत युवकाने केला आहे.

मृत युवकाला तीन मुलेमृत कमल आणि त्याच्या पत्नीचा प्रियकर या दोघांत ७ ऑक्टोबर रोजी वाद झाला होता, त्यानंतर दोघांमध्ये समझोता झाला होता. मात्र पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी मृत तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली होती. परंतु त्यावर पुढे काही झाले नाही. त्यामुळे हे टोकाचं पाऊल तरुणाने उचललं असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"