शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्षणिक सुख महागात पडेल, जेलची हवा खावी लागेल; 'सेक्स स्टेल्थिंग' म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 11:50 IST

आता हा प्रकार गंभीर स्वरुपाचा गुन्हा मानला जात आहे. अनेक देशात सेक्स स्टेल्थिंग हा गुन्हा आहे. 

अलीकडेच नेदरलँडमध्ये असं समोर उघडकीस आलंय जिथे सेक्सवेळी पार्टनरनं विना मर्जी कंडोम काढले. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा मुलाने असं कृत्य करून मुलीचा विश्वासघात केल्याचं न्यायाधीश म्हणाले. मुलीचा जगण्याचं मूलभूत स्वातंत्र्य हिरावण्याचा हा प्रकार असून कोर्टाने आरोपी मुलाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. 

तुम्हाला माहित्येय? सेक्स स्टेल्थिंग म्हणजे काय. सेक्स स्टेल्थिंग म्हणजे ती फसवणूक जी क्षणिक सुखासाठी पार्टनरसोबत बेडवर केली जाते. म्हणजे संभोग करतेवेळी पार्टनरला न सांगता कंडोम हटवणे. अनेकदा मुले क्षणिक सुखासाठी मज्जा म्हणून याप्रकारची मुलीची फसवणूक करतात ज्यात मुलीला न सांगता कंडोम काढले जाते. परंतु आता हा प्रकार गंभीर स्वरुपाचा गुन्हा मानला जात आहे. अनेक देशात सेक्स स्टेल्थिंग हा गुन्हा आहे. 

पार्टनरची फसवणूक करून जेलची हवा खावी लागेलयाआधीही सेक्स स्टेल्थिंगचे अनेक प्रकरणे समोर आलीत. न्यूझीलंडमध्ये २०१८ मध्ये ५० वर्षीय जेसी नावाच्या एका व्यक्तीवर संभोगावेळी कंडोम हटवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. जेसीने एका देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत १ तासासाठी व्यवहार केला होता. परंतु सेक्स करताना महिलेच्या इच्छेविरोधात तिला न जुमानता जेसीने बळजबरीने कंडोम हटवले. या घटनेनंतर महिलेने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. दिर्घकाळानंतर या खटल्यावर निकाल आला त्यात जेसीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून दोषी ठरवत त्याला ३ वर्ष ९ महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. 

अनेक देशात संभोगावेळी कंडोम हटवणे गुन्हान्यूझीलंडमध्येच काही महिन्यांपूर्वी २८ वर्षीय युवकाला सेक्स स्टेल्थिंगसाठी जेलमध्ये जावे लागले. तर जर्मनीत एका पोलिसालाही शिक्षा सुनावण्यात आली. आता संपूर्ण जगात या मुद्द्यांवरून चर्चा सुरू झाली आहे. अनेक युरोपियन देशात फसवणूक करून कंडोम हटवणे या गुन्ह्याविरोधात कायदा बनवत आहेत. असुरक्षित संबंध ठेवणे विशेषत: मुलींमध्ये याविरोधात जागरुकता वाढत आहे. मुली पार्टनरसोबतच्या बेड चीटिंगविरुद्ध कोर्टात जात आहेत.  

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हा