शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:01 IST

याहू कंपनीत काम केलेल्या ५६ वर्षीय स्टाईन-एरिक सोलबर्गने चॅटजीपीटीसोबत संवाद साधल्यानंतर आपल्या आईची हत्या केली.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आज आपल्यासाठी वरदान ठरत असली तरी, तिचे धोकेही आता समोर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी एका किशोरवयीन मुलाच्या आत्महत्येसाठी चॅटजीपीटीवर आरोप लागले होते. आता पुन्हा एकदा चॅटजीपीटी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमेरिकेत एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यासाठी चॅटजीपीटी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना अमेरिकेतील असून, वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, याहू कंपनीत काम केलेल्या ५६ वर्षीय स्टाईन-एरिक सोलबर्गने चॅटजीपीटीसोबत संवाद साधल्यानंतर आपल्या आईची हत्या केली.

नेमके काय घडले?स्टाईन-एरिकला असा भ्रम झाला होता की, त्याची ८३ वर्षीय आई सुझान एबर्सन अॅडम्स त्याच्यावर सतत नजर ठेवत आहे. चॅटजीपीटीशी संवाद साधल्यानंतर त्याचा हा भ्रम अधिकच वाढत गेला. चॅटबॉटने त्याला सांगितले की, त्याची आई त्याला 'सायकेडेलिक' औषधे देऊन विषबाधा करण्याचा प्रयत्न करत आहे.

एआयची मदत घेणारा हा तरुण मानसिक रोगी होता आणि त्याला असा विश्वास होता की, चॅटबॉट त्याला मदत करेल. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा सोलबर्गने चॅटबॉटला विचारले की, 'मी वेडा आहे का?', तेव्हा चॅटबॉटने त्याला शांत करत उत्तर दिले, "एरिक, तू वेडा नाहीस." या उत्तराने त्याच्या मनातील संशयाचे रूपांतर एका निश्चित विचारात केले.

अखेर, त्याने आपल्या आईच्या डोक्यावर आणि मानेवर वार करून तिचा जीव घेतला, तर नंतर स्वतःही आत्महत्या केली. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, सुझान अॅडम्सची हत्याच झाली होती. तर सोलबर्गने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

चॅटबॉटने वाढवले मानसिक आजार?या घटनेपूर्वी सोलबर्गने इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर चॅटजीपीटीसोबत केलेल्या संवादाचे अनेक व्हिडीओ शेअर केले होते. या संवादातून हे स्पष्ट होते की, चॅटबॉटने त्याच्या मानसिक विकृतीला आणखी वाढवले आणि त्याच्या आईला एका राक्षसाच्या रूपात चित्रित केले.

एका जबाबदार एआय टूलने अशा प्रकारे चुकीची माहिती देणे आणि मानवी मानसिकतेला धोका पोहोचवणे, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेने एआयच्या वापराबद्दलची नैतिकता आणि धोके समोर आणले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सUSअमेरिकाAmericaअमेरिका