शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत

By अझहर शेख | Updated: July 11, 2024 00:36 IST

ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्या मागील काही महिन्यांपासून शिंदेसेनेत नाहीत

अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: तेलंगणा राज्यात जूनमध्ये अमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात पंचवटी पेठफाटा परिसरातून संशयित लक्ष्मी ताठे व त्यांचा मूलगा विकास ताठे हिला तेलंगणाच्या वारंगल आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी (दि. १०) अटक केली. पंचवटी पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली. दुपारी तेलंगणा पोलिस या मायलेकाला घेऊन पंचवटीतून रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शिंदेंसेनेत त्या मागील काही महिन्यांपासून नाहीत.

अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना तेलंगणा राज्याच्या वारंगल पोलिसआयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिसांनी गांजाच्या तस्करी प्रकरणात नाशिकच्या पंचवटी भागात बुधवारी कारवाई केली. दामेरा पोलिसांचे पथक पंचवटीत आले होते. पंचवटी पोलिसांना त्यांनी कारवाईबाबत माहिती देऊन एक पथक सोबत घेत संशयित ताठे मायलेकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पंचवटी भौलीस ठाण्यात नोंद करत पथक दामेराकडे रवाना झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दामेरा पोलिसांनी ८ जून २०२४ रोजी त्या भागात १९० किलो गांजा पकडला होता.

या प्रकरणात बीड, अहमदनगर येथून दोन तस्करांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हा गांजाचा साठा नाशिकच्या पंचवटी भागात या ताठे नामक महिलेकडे पोहोच केला आणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन लक्ष्मी व विकास या दोघांना ताब्यात घेतले. यापूर्वीही २०१८ व २०१९ साली नाशिकमध्ये गुन्हे शाखांच्या पथकांनी गांजा तस्करीमध्ये लक्ष्मी ताठे व अन्य संशयितांना अटक केली होती.

...तेव्हा गुदामातून ६९० किलो गांजा केला होता जप्त

२०१८ साली औरंगाबादरोडवरील एका संशयास्पद गुदामावर छापा टाकून नाशिकच्या गुन्हे शाखेने तब्बल ३४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ६९० किलो गांजा हस्तगत केला होता. है गोदामदेखील ताठे हिच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. यावेळी तिचा जावई संशयित सुमित बोराळे व त्याचा साथीदार सुरेश महाले, लक्ष्मी हाते यांना अटक करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत थेट ओडिसापर्यंत धागेदोरे शोधून कावत तेथील संशयित अकबर खान या मुख्य पुरवठादाराच्याही मुसक्या बांधल्या होत्या, तसेच जळगावच्या पारोळा येथूनही सुरेश बेलदार, सुखदेव पवार आणि सिन्नरमधून संतोष गोळे या संशयितांना अटक केली होती.

टॅग्स :NashikनाशिकSmugglingतस्करीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे