शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लगीन ठरलं, मंडप सजला, वाजत गाजत वऱ्हाड आले; इतक्यात नवऱ्याला मिळाला १ फोटो, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:58 IST

ही संपूर्ण घटना मुलीकडच्या पाहुण्यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली.

सीतामढी - बिहारच्या सीतामढी भागात एका घरात लग्नाची धुमधडाक्यात तयारी सुरू होती. मुलीच्या घरचे वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्याचवेळी एका फोटोमुळे लग्न मंडपात भयाण शांतता पसरली. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं नवरीचा अश्लिल फोटो नवरदेवाला पाठवला. व्हायरल झालेला फोटो पाहून युवक भडकला. त्याने मंडपात पोहचताच फोटोवरून गोंधळ घातला आणि लग्न मोडलं. 

ही संपूर्ण घटना मुलीकडच्या पाहुण्यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. मुलीच्या आईनं तक्रार नोंदवली. हे प्रकरण बाजपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. लग्न २१ नोव्हेंबरला होणार होतं. नवऱ्याचा साखरपुडा झाला होता. सर्व काही व्यवस्थित चालले होते. मुलाच्या बाजूने लग्नाच्या वऱ्हाडाची तयारी करण्यात आली होती. मुलीच्या बाजूनेही जवळपास सगळी तयारी जोरात सुरू होती. वऱ्हाडी आणि पाहुण्यांची सेवा आणि आदरातिथ्य यासाठी सज्ज होते. मुलीच्या हाताला मेहेंदी लावण्यात आली. लग्नात सहभागी होण्यासाठी काही नातेवाईकही पोहोचले होते. मात्र मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला हा सर्व प्रकार त्रासदायक वाटत होता. मग त्याने अशी युक्ती केली की ज्यामुळे हे लग्न मोडले.

नवरीचे अश्लिल फोटो नवऱ्याला पाठवलेमुलीच्या शेजारी असलेल्या या व्यक्तीने वधूचा अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याने नवऱ्याला मुलीचे अश्लील फोटोही पाठवले. त्यानंतर मुलाच्या बाजूने लग्नाचे नाते तोडण्यात आले. त्याचवेळी या घटनेने दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली. या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या आईने जिल्ह्यातील बाजपट्टी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.

हे प्रकरण उघडकीस येताच, बाजपट्टी पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 67(ए) अंतर्गत एफआयआर नोंदवला. आयटी अॅक्टचे प्रकरण असल्याने त्याच्या तपासाची जबाबदारी पुपरीचे पोलीस सर्कल इन्स्पेक्टर शशिभूषण सिंग यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आरोपी तरुणाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"