शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

नागपुरात वेकोलिच्या व्यवस्थापकाला महिलेने केले ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:28 IST

वेकोलिच्या व्यवस्थापकाला एका महिलेने खोट्या रेप केसमध्ये अडकविण्याचा धाक दाखवून त्याच्याकडून १५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देखोट्या रेप केसमध्ये फसविण्याची धमकी : १५ लाखांची खंडणी मागितली : सदनिकेवरही कब्जा करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेकोलिच्या व्यवस्थापकाला एका महिलेने खोट्या रेप केसमध्ये अडकविण्याचा धाक दाखवून त्याच्याकडून १५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर महिला आणि तिच्या साथीदाराने पीडित व्यक्तीची सदनिकाही हडपण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून दोन वर्षे त्रास सहन केल्यानंतर धोका होण्याचे संकेत मिळाल्याने पीडित व्यक्तीने थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.चिना शुभामाला रेड्डी (वय ५२) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. ते चेतना अपार्टमेंट मानकापूर येथील रहिवासी असून सध्या वेकोलि चंद्रपूरला वरिष्ठ व्यवस्थापक असल्याचे कळते. आरोपी महिलेचे नाव सोनाली साखरे उर्फ सिमरण शर्मा (वय ३०) आहे. ती गड्डीगोदाममधील रहिवासी होय.तीन वर्षांपूर्वी सोनालीसोबत एका मित्राच्या माध्यमातून रेड्डींची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ती बहरतच गेली. रेड्डी यांची दोन्ही मुल शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी राहतात. पत्नीला त्यांच्या मैत्रीणीची माहिती कळाल्याने त्यांच्यात कलह निर्माण झाला. नंतर पत्नीही रेड्डी यांच्यापासून वेगळी राहू लागली. दरम्यान, रेड्डींच्या सोनालीसोबत भेटी गाठी वाढल्या. व्हॉटस्अ‍ॅपवरही हे दोघे निरंतर संपर्कात होते. एकमेकांना नको तशा क्लिपींगचे शेअरिंगही ते करीत होते. या दोघांना एकत्र बघून एका मित्राने रेड्डींना सोनालीबाबत सविस्तर माहिती देऊन तिच्यापासून दूर राहा, असा सल्ला दिला. तसे संकेत पूर्वीच रेड्डीला मिळाले होते. त्यामुळे त्यांनी सोनालींना टाळणे सुरू केले. फोनवरही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे सोनाली संतापली. तिने रेड्डीला धमकावणे सुरू केले. आपल्या साथीदारांसह ती रेड्डींच्या सदनिकेत शिरली आणि त्यांना मारहाण करून त्याची क्लीप बनविली. यावेळी खोट्या रेप केसमध्ये अडकविण्याचा धाक दाखवून रेड्डी यांच्या खिशातून १५ हजार रुपये हिसकावून घेतले. १५ लाखांची खंडणी दिली नाही तर तुम्हाला उध्वस्त करू, अशी धमकी सोनाली आणि तिचे साथीदार रेड्डींना देत होते. एक दिवस त्यांनी रेड्डीच्या सदनिकेचे कुलूप तोडून कब्जा करण्याचाही प्रयत्न केला. सहनिवाश्यांच्या विरोधामुळे आरोपी सोनालीचा हा प्रयत्न फसला.१३ सप्टेंबर २०१८ ला सोनालीने पुन्हा तेथे जाऊन आरडाओरड केली. रेड्डीकडून ही सदनिका विकत घेतल्याचे सांगून आपण पोलीस विभागात आहो, अशी बतावणी करत तिने सहनिवासींवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. तिच्या आणि साथीदाराच्या धाकामुळे रेड्डी घर बदलवून राहू लागले. त्यांनी सोनालीचे सर्व नंबर ब्लॉक केले. त्यामुळे सोनाली वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना फोन करून धमकावू लागली. सेटलमेंटच्या नावाखाली तिने एकदा साथीदाराच्या माध्यमातून रेड्डींना जाफरनगरात बोलविले. तेथेही तिने रेड्डींना खंडणी मागितली. नकार देताच त्यांना खोलीत डांबून बेदम मारहाण केली. तिच्याकडून धोका होण्याचे संकेत मिळाल्याने त्रस्त झालेल्या रेड्डीने गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. त्यांना आपली कैफियत ऐकवून मदतीची याचना केली. डॉ. उपाध्याय यांनी थेट मानकापूरच्या ठाणेदारांना या प्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेड्डी यांची तक्रार नोंदवून सोनाली व साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.अनेकांना फसविले ?सोनाली आधी एका हॉटेलमध्ये काम करायची. हॉटेलमध्ये येणाऱ्या काही जणांना तिने अशाच प्रकारे घुमविल्याची चर्चा होती. मोठा माल हाती लागल्याने ती निर्ढावली. नंतर तिने साथीदारांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगलाच आपला व्यवसाय बनविला. रेड्डीसारखे अनेक जण तिने आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे पोलीस सांगतात. बदनामीच्या धाकामुळे अनेकजण पोलिसांकडे येण्यासाठी कचरतात. त्याचाच गैरफायदा सोनाली सारख्या महिला घेतात. अनेकदा पोलिसांचीही भूमिका संशयास्पद ठरते. पीडितांनी थेट वरिष्ठांकडे तक्रारी केल्यास सोनालीसारख्या महिलांचा पर्दाफाश होऊ शकतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWestern Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूर