शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टरबूज उत्पादक १५ शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 15:39 IST

नदीम अनवर कुरेशी (वय ४७, रा. दिल्ली) व शिराजोद्दीन (४५, रा. जयपूर, राजस्थान) अशी या गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

- नरेंद्र खंबायत 

अडावद, जि. जळगाव : अडावद (ता. चोपडा) परिसरातील टरबूज उत्पादक १५ शेतकऱ्यांची तब्बल ३५ लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दिल्ली, राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम अनवर कुरेशी (वय ४७, रा. दिल्ली) व शिराजोद्दीन (४५, रा. जयपूर, राजस्थान) अशी या गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी अडावदसह परिसरातील चांदसणी, कमळगाव, पिंप्री, वडगाव, लोणी, पंचक, धानोरा परिसरात सुमारे १५० हेक्टरवर टरबूज लागवड करण्यात आली होती. परिसरातील टरबूजची मोठी आवक लक्षात घेता दिल्ली, राजस्थान आदी ठिकाणांहून टरबूज खरेदी करण्यासाठी व्यापारी आले. सुरुवातीला रोखीने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. नंतर ते शेतकऱ्यांना थोडी-थोडी रक्कम देऊन टरबूज खरेदी करू लागले. नंतर या व्यापाऱ्यांनी उधारीवर तब्बल ३५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे टरबूज खरेदी केले.

त्यानंतर व्यापारी संपर्काबाहेर गेले. व्यापाऱ्यांशी संपर्क होत नसल्याचे शेतकरी बांधवांच्या लक्षात आले. समाधान धनगर (रा. कमळगाव) यासह १५ शेतकऱ्यांनी अडावद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नदीम कुरेशी व शिराजोद्दीन यांच्याविरुद्ध अडावद (ता. चोपडा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी