शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत जुगार अड्ड्यावर छापा मारायला गेलेल्या पोलिसांचीच धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 18:33 IST

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यास गेलेल्या पोलिसांना जुगाऱ्यांनी  येथेच्छ धुतले आणि धूम ठोकली.

आखाडा बाळापूर/दांडेगाव (हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यास गेलेल्या पोलिसांना जुगाऱ्यांनी  येथेच्छ धुतले आणि धूम ठोकली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मध्यरात्री जखमी पोलिसाच्या तक्रारीवरून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हॉटेलमालक चांदू बळवंते यास पोलिसांनी अटक केली असून दोघे स्वत: शरण आले. इतर सर्वजण फरार आहेत.  

दांडेगाव येथील चांदू बळवंते याच्या हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची  माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली. पोलीस अंकुश शेळके व हरिप्रसाद गुरुपवार हे छापा मारण्यासाठी गेले असताना  जुगाऱ्यांनीच त्यांना घेरले. दोन्ही पोलिसांनी मारहाण करुन जुगाऱ्यांची धूम ठोकली.  या मारहाणीत शेळके व गुरुपवार यांना मुका मार लागला. त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी अंकुश शेळके यांच्या फिर्यादीवरून अशोक साळुंखे, शिवपालसिंह ठाकूर, शंकर चांदीवाले, पंडित दवणे, अंबादास बळवंते, लक्ष्मण बळवंते, चांदू बळवंते व इतर एकूण तेरा जणांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले करीत आहेत.

दोन वर्षांत तिसरी घटनादांडेगाव शिवारात यापूर्वीही रामेश्वर तांडा येथील दोघांनी अवैध दारूवर छापा टाकण्यास गेलेल्या जमादारास मारहाण केली होती. दोन वर्षांपूर्वी येडशीच्या यात्रेत तिघांवर जमावाने हल्ला चढविला होता.अवैध धंदे वाल्यांची मुजोरी वाढल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. स्वत: पोलीस असुरक्षित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.   

पोलीस रिकाम्या हाताने परतलेहल्लेखोरांपैकी हॉटेलमालक चांदू बळवंते यास रात्रीच पोलिसांनी अटक केली.  लक्ष्मण बळवंते व शिवपालसिंग ठाकूर हे बुधवारी सकाळी स्वत:हून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. इतर सर्व आरोपी फरार आहेत.  आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, कुरूंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, महिला पोलीस निरीक्षक सविता बोधनकर  आदींच्या पथकाने बुधवारी गावात आरोपींचा शोध घेतला. मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.  

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसArrestअटकhospitalहॉस्पिटल