शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
2
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
3
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
4
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
5
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
6
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
7
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
8
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
9
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
10
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
11
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
12
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
13
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
15
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
16
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
17
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
18
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
19
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
20
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

तिहार जेलमधील फरार बंदीवान वर्धा पोलिसांनी केला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 22:05 IST

crime news ५ हजारांचे होते बक्षिस : १५ वर्षांपासून पोलिसांना देत होता चकमा. आरोपी यांने ले-आऊट पाडून प्लाट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामध्ये त्याने अनेक व्यक्तींचे पैसेही परत न करता तो भूमिगत झाला होता.

वर्धा : चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेला तसेच दिल्लीतील तिहार येथील कारागृहातून फरार झालेल्या धनराज संतोष खैरकार याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. विशष म्हणजे धनराज हा मागील १५ वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होता. शिवाय त्याच्यावर ५ हजारांचे बक्षीस होते.

पोलीस स्टेशन डीबीजी रोड, दिल्ली अ.प.क्र. ६३/२००० कलम ३९४, ३९८, ३४ भादंवि गुन्हयातील आरोपी धनराज संतोष खैरकार याला सदर गुन्ह्यात २००४ मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर तो दिल्लीतील तिहार येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. २००५ मध्ये धनराज याने तिहार येथील कारागृहातून पळ काढला. त्यानंतर त्याचा शोध जेलप्रशासन घेत होते. दरम्यान तिहार कारागृह प्रशासनाकडून वर्धा पोलिसांची मदत मागण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष चमू तयार करून धनराजचा शोध घेण्यास सुरूवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे धनराज याला हूडकून काढत ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, स्था.नि.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, प्रमोद जांभूळकर, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, अक्षय राऊत, अल्का कुंभलवार यांनी केली.बदलविले होते नावधनराज याने २८ जून २००८ ला स्वतःचे नाव धनराज संतोष खैरकार ऐवजी यश संतोष खैरकार असे बदलविले. तो स्वप्नील कळबं अपार्टमेंन्ट प्लॅट नंबर ३०२ स्नेहल नगर नागपूर येथे वास्तव्यास होता. आरोपी यांने ले-आऊट पाडून प्लाट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामध्ये त्याने अनेक व्यक्तींचे पैसेही परत न करता तो भूमिगत झाला होता. त्यानंतर त्याने ड्राय फ्रुट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. तसेच हा सर्व व्यवहार हा आरोपी ऑनलाईन करीत होता. यश खैरकार हाच धनराज खैरकार आहे, असा संशय बळावल्याने त्याची इतर माहिती काढून शाहनिशा करण्यात आली. तसेच त्याने केलेल्या व्यवहाराचे कागदपत्र पडताळून तिहार जेल न्यू दिल्ली येथून मिळालेल्या माहितीवरून यश संतोष खैरकार हाच धनराज संतोश खैरकार आहे हे निष्पन्न झाल्याने आरोपीस नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. शिवाय आरोपीस तिहार जेल क्र ३ न्यू दिल्ली येथे दाखल करण्यासाठी पुलगाव पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :jailतुरुंग