शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर सासूच्या परवान्यावर सुनेने ‘गर्भपात’ वारसा पुढे चालवला; खळबळजनक माहिती उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 08:24 IST

४० वर्षे जुने रुग्णालय असलेल्या कदम रुग्णालयात डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे गर्भपात शासकीय अधिकृत केंद्राचा परवाना आहे. मात्र, सून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या नावावर परवाना नाही.

वर्धा : संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या आर्वीतील गर्भपात प्रकरणात दररोज नवे रहस्य उलगडत आहे. मागील ४० वर्षांपासून गर्भपात करूनच कदम रुग्णालयाचा डोलारा सुरू असून डॉक्टर सासूच्या परवान्यावर सुनेने ‘गर्भपात’ वारसा पुढे चालवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ४० वर्षे जुने रुग्णालय असलेल्या कदम रुग्णालयात डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे गर्भपात शासकीय अधिकृत केंद्राचा परवाना आहे. मात्र, सून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या नावावर परवाना नाही. सासूच्या परवान्यावरच सुनेचा गर्भपाताचा अवैध व्यवसाय सुरू होता, असे सांगण्यात येत आहे. या दिशेने पोलीस तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा हिला अटक केली. त्यानंतर दोन परिचारिका आणि सासू डॉ. शेलेजा कदम यांनाही ताब्यात घेतले. प्रकृती खालावल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.  कदम रुग्णालयात अनेक वर्षांपासून अवैध गर्भपातांतून कोट्यवधींची माया जमविल्याची माहिती मिळाली.रेखाचा पती उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टरयाच रुग्णालयात मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. निरज कुमारसिंग कदम हे कंत्राटी डॉक्टर म्हणून सेवा देतात. त्यामुळे अवैध गर्भपातादरम्यान शासकीय रुग्णालयातील ‘मिजोप्राॅस्ट’चा वापर कदम हॉस्पिटलमध्ये होत तर नव्हता ना? याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत.     - संबंधित वृत्त/महाराष्ट्र