शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विवेक ओबेरॉयच्या माजी व्यावसायिक भागीदाराला अटक; दीड कोटींच्या फसवणूक प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 19:13 IST

सिने क्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरु केलेल्या आनंदीता एंटरटेनमेंट एलएलपीमधील भागीदार होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयचे माजी व्यावसायिक भागीदार आणि निर्माता संजय सहा याला दीड कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सिने क्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरु केलेल्या आनंदीता एंटरटेनमेंट एलएलपीमधील भागीदार असलेल्या सहा आणि अन्य आरोपींनी दीड कोटी रक्कमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी विवेक ओबेरॉय यांनी एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

ओबेरॉय यांच्या ओबेरॉय मेगा इंटरटेमेंट फर्मचे लेखापाल देवेन जवाहरलाल बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी - संजय सहा, नंदिता सहा, राधिका नंदा आणि इतरांविरुद्ध जुलैमध्ये गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय ऑर्गनिक एल एलपीची स्थापना झाली. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या फर्मचे भागीदार आहे. ऑरगॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी सिने क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. याच दरम्यान विवेक यांची संजय सहा यांच्याशी ओळख झाली. सहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संजय सहा यांच्यासह, नंदिता सहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या फर्ममध्ये भागीदार बनवले.

पुढे त्यांनी, आनंदीता एंटरटेनमेंट एलएलपी हे फर्म स्थापन केली. यामध्ये विवेक ओबेरॉय यांना वैयक्तिक खात्यातून तसेच ओबेराय मेगा इंटरटेनमेंट एल एल पी या फर्ममधून एकूण ९५,७२,८१४ ही रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वेळोवेल्ली विविध कारणे पुढे करत, आनंदीता फर्मला कुठलीही माहिती विवेक यांच्या १,५५,७२,८१४ रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. ४ फेब्रुवारी २०२० ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जुलैमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, संजय सहा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

 

टॅग्स :Vivek oberoyaविवेक ऑबेरॉय