शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बिहार पेटलं! मूर्ती विसर्जनावेळी जमावाने जाळले पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाने हटवले DM, SP

By पूनम अपराज | Updated: October 29, 2020 18:16 IST

Voilence in Bihar : स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरले आणि मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या लोकांनी येथे गोंधळ घातला. 

ठळक मुद्देमुंगेरमधील परिस्थिती पाहता जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

बिहारच्या मुंगेरमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान घडलेल्या घटनेबाबत आज पुन्हा प्रकरण तापलं. संतप्त जमावाने पूर्व सराय पोलिस स्टेशनपेटवून दिले. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरले आणि मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या लोकांनी येथे गोंधळ घातला. 

दरम्यान, मुंगेरमधील परिस्थिती पाहता जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यासह संपूर्ण प्रकरणाचा तपास मगध विभागाचे विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे, ते तपास सात दिवसांत करून आपला अहवाल सादर करतील. आज नवीन डीएम आणि एसपी यांना कर्तव्यावर तैनात करण्यात येईल. 

एसपी कार्यालयालाही घेराव, तोडफोडसुरुवातीच्या अहवालानुसार शेकडो तरुणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निदर्शने केली. पोलीस कार्यालयाशेजारील बोर्डही उखडले गेले. निषेध करणार्‍या युवकांनी पूर्व सराय पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या कारला आग लावण्यात आली. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस दल पाठविण्यात आले आहे. मुंगेरमधील पोलिसांच्या कारवाईमुळे लोक संतप्त आहेतदुर्गा मूर्तीच्या विसर्जनावेळी चेंबर ऑफ कॉमर्सने आज मुंगेर बाजार बंद ठेवण्याची मागणी केली आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कृष्णा कुमार अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकारी बाजारपेठेत व्यवसायिकांना दुकान बंद करण्याची विनवणी करताना दिसले. यामुळे बहुतेक दुकानेही बंद आहेत. सध्या मुंगेरचे वातावरण तणावपूर्ण असून विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.डीएम म्हणाले - कुणाच्याही आदेशानुसार बुलेट चालली नाहीगोळीबाराबाबत मुंगेरचे डीएम म्हणतात की, दीनदयाळ चौकात हिंसाचार आणि गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर ही घटना नियंत्रित केली गेली. मुंगेरच्या लोकांमुळेच शांततेत निवडणूक पार पडली हे निश्चितच आणि ते शक्य झाले. त्यासाठी मुंगेरचे लोक नक्कीच आभारास पात्र आहेत. मुंगेर डीएम म्हणाले की, काही समाजकंटकांनी खूप मोठे षडयंत्र रचले होते आणि त्या षडयंत्रामुळे ही घटना घडली आहे. जी लवकरच उघडकीस येईल. मुफस्सिल पोलिस स्टेशनचे अध्यक्ष आणि बासुदेवपूर ओपी अध्यक्ष यांना तातडीने काढून टाकण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आपापल्या घरातच राहावे व शांतता पाळली पाहिजे, असे आवाहन जनतेला केले आहे.मुंगेरचे डीएम म्हणाले की, पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप झाला असेल तर एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की, पोलिसांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक टीम स्थापन करण्यात आली आहे आणि पोलिसांना आपल्या बाळाचा वापर करण्याचे आदेश दिले नव्हते. पोलिसांच्या स्तरावर जर बेजबाबदारपणा केला असेल तर इतकी शिक्षा दिली जाईल, की जेणेकरून ती शिक्षा लक्षात राहील.

टॅग्स :FiringगोळीबारBiharबिहारPoliceपोलिसElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग