शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

Video : आयशा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा : पत्नीसमोरच पती करायचा असे काही...

By पूनम अपराज | Updated: March 2, 2021 20:59 IST

Shocking revelation in Ayesha suicide case : राजस्थानातील एका मुलीशी आरिफचे प्रेमसंबंध होते. आरिफ आयशासमोर व्हिडिओ कॉलवर प्रेयसीशी बोलत असे.

ठळक मुद्देमोबाईल लोकेशनच्या आधारे सोमवारी रात्री आरिफला पाली येथून अटक करण्यात आली.

गेल्या शनिवारी अहमदाबादमधील साबरमती नदीत २३ वर्षीय आयशाने उडी मारुनआत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आयशाने एक हसत आयुष्य संपवताना व्हिडिओही बनविला होता. आता आयशाच्या हास्यामागील वेदना वकीलांच्या माध्यमातून उघडकीस आल्या.आयशाचे वकील जफर पठाण यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, २३ वर्षीय आयशाचे राजस्थानातील जलोर येथे राहणाऱ्या आरिफशी लग्न झाले होते. राजस्थानातील एका मुलीशी आरिफचे प्रेमसंबंध होते. आरिफ आयशासमोर व्हिडिओ कॉलवर प्रेयसीशी बोलत असे. तो तिच्या मैत्रिणीवर पैसे खर्च करत असे आणि म्हणूनच तो आयशाच्या वडिलांकडून पैशाची मागणी करत असे.

वकील म्हणाले- लग्नाच्या २ महिन्यांनंतरच आयशाचा संघर्ष सुरू झालासाबरमती रिव्हरफ्रंटवर आयशाने बनवलेल्या व्हिडिओने लोकांना हैराण केले आहे, असे जफर स्पष्ट करतात. पण वास्तविकता अशी आहे की, तिच्या लग्नाच्या २ महिन्यांनंतर आयशाचा संघर्ष सुरू झाला. आरिफने स्वत: आयशाला सांगितले की, त्याचे दुसर्‍या मुलीवर प्रेम आहे. असे असूनही, आयशा तिच्या गरीब आई-वडिलांचा अब्रू चव्हाट्यावर न आणण्यासाठी लढत राहिली. ती प्रत्येकक्षणी नवीन समस्येतून गेली, परंतु गप्प राहिली. तिच्यासाठी तिच्यासमोर पतीचे प्रेयसीशी बोलणं यापेक्षा आणखी काय वाईट असू शकते.आयशाने शेवटपर्यंत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केलाआयशाच्या वकिलाने सांगितले की, आयशा एक हुशार मुलगी होती. अभ्यासाव्यतिरिक्त ती घरातील प्रत्येक कामात हुशार होती. लहानपणापासूनच तिने ज्या प्रकारे घरगुती जबाबदाऱ्या हाताळल्या त्याच प्रकारे आपल्या सासरच्या घरातही तिने तसे प्रयत्न केले. आपल्या परिवाराला त्रास होऊ नये म्हणून तिने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या वेळी आयशाच्या वडिलांनी मुलीला आवश्यक असलेली सर्व वस्तू दिल्या, पण आयशाचे पती आणि सासू-सासरे समाधानी नव्हते.तणावामुळे गर्भाशयात मुलाचा मृत्यू झालादरम्यान, आरिफने एकदा आयशाला अहमदाबादला सोडल्याची माहितीही समोर आली आहे. त्यावेळी आयशा गर्भवती होती. तुम्ही मला दीड लाख रुपये दिले तर मी आयशाला माझ्याबरोबर घेऊन जाईन, असे आरिफने म्हटले होते, असा आरोप परिवाराने केला आहे.गर्भवती असताना आरिफच्या वागण्यामुळे आयशा चक्रावून गेली होती. ती नैराश्यात आली. तणावामुळे, तिला बराच रक्तस्त्राव होऊ लागला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली, परंतु तिच्या जन्मला येणाऱ्या मुलाला वाचविणे शक्य झाले नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, असे असूनही आरिफ आणि त्याच्या कुटुंबावर आमची हरकत नव्हती. ते सतत पैशांची मागणी करत राहिले.आरिफला शिक्षा झाली पाहिजे: आयेशाचे वडील आयशाचे वडील लियाकत अली यांनी मंगळवारी सांगितले की, आरिफच्या वडिलांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी फोन आम्ही करायचो, परंतु त्यांनी माझा फोन कधीच उचलला नाही. माझी आयशा परत येणार नाही, परंतु तिच्या अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून दुसर्‍याच्या मुलीचे असे होणार नाही. माझी मुलगी आयशा आनंदी होती, पण हुंडाबळीनंतर तिचे आयुष्य नरकमय झाले. एकदा सासरच्यांनी तिला तीन दिवस अन्नही दिले नाही.आयशाच्या पतीला पाली येथे अटकगुजरात पोलीस जलोरमधील आरिफच्या घरी पोहोचले, तेव्हा कुटुंबीयांनी सांगितले की, तो लग्नाला गेला आणि कुठेतरी गेला होता. यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे सोमवारी रात्री आरिफला पाली येथून अटक करण्यात आली.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसadvocateवकिलahmedabadअहमदाबादGujaratगुजरातArrestअटकdowryहुंडा