शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : नशीब बलवत्तर! लाॅन्चमधून समुद्रात प्रवासी पडला, पोहता येत असल्याने वाचला जीव                                                                                                              

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:14 IST

Drowning Case : सुदैवाने त्या प्रवाशाला पोहता येत असल्यामुळे तो सुखरूप बोटीत परतला. या घटनेमुळे जल प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर कशी आहे. हे पुन्हा सिध्द झाले आहे. 

निखिल म्हात्रे                                                                                                                                                                                                                                                                                     अलिबाग - गेट वे मुंबई येथून मांडवा, अलिबागकडे येणार्‍या अजंटा लॉन्चमधून एक प्रवाशी समुद्रात पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या प्रवाशाला पोहता येत असल्यामुळे तो सुखरूप बोटीत परतला. या घटनेमुळे जल प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर कशी आहे. हे पुन्हा सिध्द झाले आहे.  प्रशांत खामकर असे पाण्यात पडलेल्या प्रवाशांचे नाव आहे. प्रशांत यांनी आपण स्वतःच्या चुकीमुळे पडलो असल्याचे मांडवा पोलिस ठाण्यात लेखी दिले आहे, अशी माहिती पाेलिस सहायक निरीक्षक राजा पाटील यांनी दिली.

आज सकाळी नऊ वाजता गेट वे वरून सुटलेली अजंटा लॉन्च मांडवा-अलिबागकडे येत होती. मांडव्यापासून काही अंतरावर असतानाच बोटीच्या गेटला लावलेली फळी तुटली. त्यामुळे प्रशांत खामकर हा प्रवाशी थेट समुद्रात पडला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  

प्रवाशांनी आरडा ओरड सुरू केली. मात्र प्रशांतला पोहता येत असल्यामुळे तो स्वतः पोहत बोटीत सुखरूप परतला. प्रशांत यांना बाेटीतील कर्मचाऱ्यांनी दाेरीच्या सहायाने बाेटीमध्ये घेतले. बोटीच्या गेटजवळील फळीला टेकू नकोस असे त्याला सांगण्यात आले होते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढील प्रसंग घडल्याचे बोट कर्मचार्‍यांनी सांगितले.दरम्यान, या घटनेनंतर फेरी बोटीतील सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या प्रवाशाला पोहोता येत नसते तर जीव गमवाव लागला असता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.   

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेalibaugअलिबाग