शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Video: २४ तासांत माज उतरवला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीनं मागितली जाहीर माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:09 IST

आता २४ तासानंतर या व्यक्तीने दुसरा व्हिडीओ जारी करत मुंबई पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे.

ठळक मुद्देबाईकवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी त्याच्या गाडीच्या नंबरचा फोटो काढला असता जतीनने त्यांना अडवलं.रागाच्या भरात जतीन पोलिसांसोबत गैरवर्तवणूक करत राहीला.मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरून जतीन सतरा याने वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली

मुंबई – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुलुंडच्या बाजारातील आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. यावरून वाहतूक पोलीस आणि त्या व्यक्तींमध्ये कारवाईवरून वाद झाला. तेव्हा संतापलेल्या व्यक्तीनं पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला.

त्यानंतर आता २४ तासानंतर या व्यक्तीने दुसरा व्हिडीओ जारी करत मुंबई पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे. मुंबई पोलिसांच्या कार्याला मी सलाम करतो. ज्यांना माझ्या कृत्यानं वाईट वाटलं अशा सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो असं या व्यक्तीनं मी मुलुंडकर या फेसबुक पेजवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्यक्तीचं नाव जतीन सतरा असं आहे.

मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरून जतीन सतरा याने वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली. रागाच्या भरात जतीनने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि असभ्य वर्तवणूक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. अनेकांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. आरआरटी परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत होते.

त्यावेळी जतीनच्या बाईकवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी त्याच्या गाडीच्या नंबरचा फोटो काढला असता जतीनने त्यांना अडवलं. तेव्हा संतापून जतीनने वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप यांना अर्वाच्च भाषेत सुनावत दोघांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा जतीनसोबत असणाऱ्या तरूणाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. जतीनला शांत करण्याचा प्रयत्न तो तरूण करत होता. परंतु रागाच्या भरात जतीन पोलिसांसोबत गैरवर्तवणूक करत राहीला. या प्रकरणाची दखल वाहतूक पोलिसांनी घेत जतीन सतराविरोधात गुन्हा नोंदवला. वाहतूक पोलिसांनी घातलेली हुज्जत पाहून अनेकांनी जतीनवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर २४ तासांत जतीनचा माज उतरला आणि त्याने व्हिडीओ बनवून पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस