शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

२९८ कोटींच्या फसवणूकप्रकरणी व्हीजीएनच्या व्यवस्थापिकेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 10:19 IST

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : ठाणे परिसरातील १४ हजार ३४० गुंतवणूकदारांना गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अल्पावधीतच जास्त पैसे तसेच सोने देण्याच्या योजनांचे प्रलोभन दाखवून तब्बल १४ हजार ३४० गुंतवणूकदारांकडून २९८ कोटी ९६ लाख ९२ हजार २६४ रुपयांची  फसवणूक करणाऱ्या व्हीजीएन ज्वेलर्स प्रकरणातील वॉन्टेड आरोपी व्यवस्थापिका लीना पिटर हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी मंगळवारी दिली. 

 लोकांना सोने आणि इतर योजनांचे आमिष दाखवून  विरीथगोपालन नायर आणि वत्सला नायर यांनी व्हीजीएन ज्वेलर्स नावाने वित्तीय संस्था सुरू केली होती. डोंबिवली पूर्व, उल्हासनगर आणि मुंबईतील मुलुंडमध्ये ही दुकाने होती. यातील मुख्य सूत्रधार तथा आरोपी विरीथगोपालन नायर याने २००६ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना दरमहा पाचशे रुपयाप्रमाणे २४ महिने गुंतविल्यास १२ हजारांच्या बदल्यात १४ हजार रुपये मिळतील किंवा तितक्याच रकमेचे सोने देण्यात येईल. तसेच एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १५५ टक्के दराने व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरुपात परत दिले जायचे. मात्र,  गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील परतावा परत न देता ६६ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये दाखल झाला होता.

पोलिसांचे आवाहन सोन्याची दुकाने, सोन्यामधील गुंतवणुकीची योजना तसेच इतर योजनांद्वारे अवाजवी परतावा आणि गुंतवणुकीच्या फसव्या आमिषाला गुंतवणूकदारांना फसवू शकतात. अशा कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. तसेच व्हीजीएन ज्वेलर्सच्या गुंतवणूकदारांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मुख्य सूत्रधाराला यापूर्वीच अटकयापूर्वी व्हीजीएन ज्वेलर्सचा मालक विरीथगोपालन याला ५ ऑक्टोबर २०२१ मध्ये आणि त्याचा मुलगा गोविंदगोपालन याला २ डिसेंबर २०२१ रोजी अटक झाली. आता ७ मार्च २०२२ रोजी यातील वॉन्टेड व्हीजीएन ज्वेलर्सची व्यवस्थापिका लीना पीटर हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. तिला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत आणि सहायक पोलीस निरीक्षक विक्रम कोळी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

४६ कोटींची पाच स्थावर मालमत्ता जप्तआतापर्यंत १४ हजार ३४० गुंतवणूकदारांची २९८ कोटी ९६ लाख ९२ हजार २६४ रुपये इतकी फसवणूक झाली. आरोपींच्या आठ बँकांमधील २८ बँक खाती गोठवून त्यातील २४ लाख १८ हजार ५०३ इतकी रक्कम गोठविली आहे. तसेच ४६ कोटींची पाच स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. विरीथगोपालन याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ४२ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी