शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठेला लावण्यावरून वाद, केक दुकानदाराकडून भाजीविक्रेत्याची हत्या

By योगेश पांडे | Updated: November 28, 2023 23:17 IST

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपी गजाननला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवडाभरात नागपुरात आणखी एका हत्येची घटना घडली आहे. केकच्या एका दुकानदाराने भाजीविक्रेत्याला मारहाण केली व त्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीतून ठेला लावण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याची बाब समोर आली असून रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभुदयाल भैय्यालाल सराटे (४०, पुनापूर रोड) असे मृतकाचे नाव आहे. तो किरायाने राहत होता व त्याच्या घराजवळच भाजीचा ठेला लावायचा. तो जेथे ठेला लावायचा त्याच्या मागे काही दुकाने आहेत. त्यात आरोपी गजानन वाडणकर याचे केकचेदेखील दुकान होते. प्रभुदयालच्या ठेला लावण्यावर दुकानदाराला हरकत होती. मात्र त्यांच्यात याअगोदर कधीही वाद झाला नव्हता.

मंगळवारी त्यांच्यात वाद झाला व गजाननने प्रभुदयालला शिवीगाळ केले. त्यावर त्यानेदेखील प्रत्युत्तर दिले. त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले व गजाननने लाकडी दांड्यासारख्या वस्तूने सराटेच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यात सराटे गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील लोकांनी या प्रकाराची पारडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपी गजाननला ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत पंचनाम्याची कारवाई व आरोपीची चौकशी सुरू होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी