शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वरुण इंडस्ट्रीजचा कॅनरा बँकेलाही ११८ कोटींचा गंडा; कर्जाचे दुबई कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 06:44 IST

सेन्ट्रल बँक ऑफ इंडियालाही घातलाय तब्बल २६९ कोटी रुपयांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाला तब्बल २६९ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या वरुण इंडस्ट्रीजने कॅनरा बँकेला देखील ११८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती हाती आली असून या प्रकरणी देखील सीबीआयने कंपनी व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सेंट्रल बँकेप्रमाणेच कॅनरा बँकेकडूनही कंपनीने कर्ज घेत त्या पैशांची अफरातफर दुबईस्थित दोन कंपन्यांशी केल्याचे दिसून आले आहे.  कंपनीने भांड्याच्या निर्यातीसाठी कॅनरा बँकेकडून १२४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, संबंधित कंपनी स्टील भांडे निर्यातीत व्यवसायच करत नसल्याचे तपासणीमध्ये आढळले.

कॅनरा बँकेच्या कर्जाचे दुबई कनेक्शन

सेंट्रल बँकेकडून मिळालेल्या कर्जातील पैसे वरुण इंडस्ट्रीजने दुबईतील दोन कंपन्यांसोबत व्यवहार केल्याचे दाखवले होते. मात्र, दुबईतील या दोनही कंपन्या कंपनीशीच संबंधित असल्याचे सेंट्रल बँकेच्या तपासात आढळून आले होते. याच दोन कंपन्यांसोबत कॅनरा बँकेकडून कर्जापोटी मिळालेल्या रकमेचा वापर कंपनीने केल्याचे दिसून आले आहे. कंपनीने हे पैसे प्रथम दुबईतील या दोन कंपन्या आणि नंतर तेथून पुन्हा मूळ कंपनीत वळविले का, याचा आता तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक