शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीची घरात घुसून तोडफोड व चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 19:50 IST

१७ वर्षांपासून प्रेमसंबंध व त्यातून झालेला ८ वर्षाचा मुलगा असे नाते असलेल्या ६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीने घरात घुसून तोडफोड करत १५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - १७ वर्षांपासून प्रेमसंबंध व त्यातून झालेला ८ वर्षाचा मुलगा असे नाते असलेल्या ६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीने घरात घुसून तोडफोड करत १५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे . 

भाईंदर पोलीस ठाण्यात या बाबत  रतनचंद रायचंद साकरीया (६४) रा. लोकमान्य शॉपिंग सेंटर , महापालिका जवळ , भाईंदर यांच्या फिर्यादी वरून गिता कृष्णा पवार (४०) रा. संकल्प निवारा, गोकुळधाम, गोरेगाव हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी साकरीया यांच्या म्हणण्या नुसार, त्यांचा वसई पूर्वेला स्टील चा व्यवसाय असून सदर ठिकाणी ते त्यांचा ७२ वर्षीय वृद्ध नोकर अचलाराम पुरोहीत सोबत गेल्या दिड वर्षां पासून राहतात . त्यांची पत्नी , दोन मुली व एक मुलगा असे कुटुंब भाईंदरच्या डीमार्ट जवळ भैरव सृष्टी येथे राहते.   

 गिता पवार सोबत गेल्या १७ वर्षापासुन प्रेमसंबंध असून तिच्या पासून एक ८ वर्षांचा मुलगा आहे . गीता हिने पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात साकरिया विरुद्ध दावा केला असून त्याचा अजून निर्णय प्रलंबित आहे . तरी देखील साकारिया हे गीताला दरमहा पोटगी रक्कम देत असतात . परंतु गीता हि पैसे , घर आदींची मागणी करून धमकावत असते . १७ जानेवारी रोजी ७ . ३० च्या सुमारास गीता हि साकरीया घरात नसताना आली व नोकरास विचारणा करून शिवीगाळ करू लागली . नोकर पुरोहित घराबाहेर निघून गेले व मालकास कळवले . गिता हिने साकरिया यांना फोन करून घरी तात्काळ न आल्यास रुममधील सामानाची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे ते वसई वरून घरी येण्यास निघाले . रात्री ते घरी पोहचले असता गीता ने घरातील टी.व्ही, फ्रिज आदी फोडले व साकरिया यांचे कपडे फाडून टाकले होते . घरात ठेवलेली १५ हजारांची रोकड सुद्धा तिने नेली होती . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी