शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचं बिंग फुटलं; पतीनं कुटुंबासह थेट पोलीस स्टेशन गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 12:22 IST

नवऱ्यानं पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार; एकूण ८ जणांविरोधात पोलिसांनी नोंदवला गुन्हा

कानपूर: उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पनकी येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्यानं त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा प्रकार तरुणाच्या लक्षात आला आणि दाम्पत्याचं भांडं फुटलं.

पत्नी तृतीयपंथी असल्याचं लक्षात येताच घरात वाद झाला. त्यानंतर लग्न करून सासरी आलेली तरुणी तिच्या माहेरी निघून गेली. या प्रकरणी तरुणानं काकादेव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तृतीयपंथी पत्नी, सासू-सासरे आणि लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाविरोधात तरुणानं तक्रार नोंदवली आहे. एकूण ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

शास्त्री नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पियूषचा विवाह २८ एप्रिल २०२१ रोजी झाला. तरुणी तृतीयपंथी असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना होती. मात्र यानंतरही विजय नगरमध्ये राहणाऱ्या सत्यदेव चौधरींनी लग्नासाठी मध्यस्थी केली. लग्नानंतर सत्य परिस्थिती समोर येताच कुटुंबाला एकच धक्का बसला. आता तुम्हाला दाखवतोच! न्याय न मिळाल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कापलं; पोलीस स्टेशन अंधारात

आपण लग्न करण्यास तयार नव्हतो. पण कुटुंबियांनी जबरदस्तीनं विवाह लावून दिला, असं तरुणीनं सांगितलं. पोलखोल होताच तरुणी माहेरी निघून गेली. फसवणूक झाल्यानं पियूषनं ८ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तरुणाची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर तरुणानं पत्नीचे वैद्यकीय अहवाल आणले. ते पाहून पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.