शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

तब्बल ११३ महिलांची तक्रार, ३६ जिल्ह्यांतील पोलीस मागावर; 'तो' आरोपी अखेर सापडलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:54 IST

तब्बल ३६ जिल्ह्यांच्या पोलिसांना हवा असलेला आरोपी अखेर गजाआड

कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबीमधून रविंद्र राणा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचा शोध ३६ जिल्ह्यांचे पोलीस घेत होते. त्याच्याविरोधात ११३ महिलांनी तक्रार दाखल केली होती. महिलांना फोन करून त्रास देणाऱ्या रविंद्रला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

अटक टाळण्यासाठी रविंद्र राणा सतत त्याचं लोकेशन आणि सिमकार्ड बदलत होता. गावाबाहेर जाऊन रविंद्र महिलांना फोन करायचा. शेतात जाऊन फोन करून झाल्यावर रविंद्र गावात यायचा आणि फोन बंद करायचा. मोबाईलवरून कोणतेही १० नंबर डायल करून तो बोलायचा.

मोबाईलवरून कोणतेही १० नंबर डायल केल्यावर रिंग वाजायची. समोरून महिलेचा आवाज आल्यास रविंद्र बोलू लागायचा आणि पुरुषाचा आवाज ऐकू आल्यास कॉल कट करायचा. वूमन पॉवर लाईनवर आलेल्या तक्रारींचा आढावा पोलिसांनी घेतला. अनेक जिल्ह्यांमधील महिलांनी रविंद्रच्या तक्रारी केल्याचं पोलिसांना समजलं. 

लखनऊपासून कानपूर, आंबेडकरनगर, वाराणसी, बलरामपूर, झाशी, गोंडा, महाराजगंज, हमीरपूरसह ३६ जिल्ह्यांचे पोलीस रविंद्रचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात एकट्या लखनऊमध्ये १९ तक्रारी दाखल आहेत. याशिवाय उन्नव, कानपूर, आंबेडकरनगरात प्रत्येकी ७, प्रयागराजमध्ये ६, सीतापूर आणि रायबरेलीत प्रत्येकी ५ तक्रारींची नोंद आहे.