शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हेडलीला हवाली करण्यास अमेरिकेचा नकार; मात्र साथीदार राणाचे प्रत्यार्पण शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 00:01 IST

लॉस एन्जल्स येथील संघीय न्यायालयात राणा याच्या जामीन अर्जास विरोध करताना अमेरिकी सरकारच्या वतीने सहायक अ‍ॅटर्नी जॉन जे, ल्युलेजियान यांनी ही माहिती दिली.

वॉशिंग्टन : २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यात अमेरिकेत खटला चाललेला आरोपी डेव्हिड हेडली याला भारताच्या हवाली करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. मात्र त्याच खटल्यातील त्याचा सहआरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीवर विचार केला जाऊ शकेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

लॉस एन्जल्स येथील संघीय न्यायालयात राणा याच्या जामीन अर्जास विरोध करताना अमेरिकी सरकारच्या वतीने सहायक अ‍ॅटर्नी जॉन जे, ल्युलेजियान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हेडली व राणा यांची प्रत्यार्पणाच्या बाबतीत तुलना होऊ शकत नाही. हेडलीने अटक होताच सर्व गुन्हे कबूल केले. त्या बदल्यात त्याची शिक्षा माफ करण्यात आली आहे. या उभयपक्षी सहमतीमध्ये हेडलीला भारतात न पाठविण्याची मुख्य अट आहे. त्याउलट राणा याने गुन्हे कबूल केलेले नाहीत. शिवाय तो तपासी यंत्रणेला सहकार्यही करीत नाही. त्यामुळे हेडली व आपण यांच्यात भेदभाव केला जात असल्याची तक्रार तो करू शकत नाही. नंतर दाऊद गिलानी असे नाव धारण केलेला हेडली हा अमेरिकी नागरिक आहे. तर राणा हा पाकिस्तानी नागरिक व व्यापारी आहे. तो हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीवर अमेरिकी सरकारकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. मुंबई हल्ल्यातील सहभागाखेरीज इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये खटला चालविण्यासाठी भारतास तो हवा आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाAmericaअमेरिका