शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उमेश कोल्हे खून प्रकरण: 'एनआयए'कडून दहाव्या आरोपीला अटक 

By प्रदीप भाकरे | Updated: August 12, 2022 23:57 IST

Umesh Kolhe murder case: अमरावती येथील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 'एनआयए'कडून १२ ऑगस्ट रोजी दहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

अमरावती : येथील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 'एनआयए'कडून १२ ऑगस्ट रोजी दहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.  शेख शकील शेख छोटू (२८, रा. इमामनगर, लालखडी, अमरावती) असे 'एनआयए'ने शुक्रवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास २ जुलै २०२२ पासून 'एनआयए' करत आहे. दरम्यान 'एनआयए'कडून आठ दिवसांपूर्वी उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या दहा झाली आहे. शुक्रवारी अटक केलेला आरोपी हा उमेश कोल्हे खून प्रकरणातील इतर आरोपींसोबत कटात सहभागी असल्याचे 'एनआयए'कडून सांगितले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान याच्यासह इतरांचा सहभाग होता. मात्र प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालायाने घेतला आणि तपास  एनआयएकडे वर्ग केला होता.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी